Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा;सुरजागड आणि कोनसरी प्रकल्पांत उत्साहपूर्ण सहभाग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २१ जून : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) या कंपनीने ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केला. सुरजागड लोहखनिज खाणी आणि कोनसरी येथील प्रकल्पांमध्ये आयोजित योग सत्रांना कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, कामगार तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला. एकूण ५०० हून अधिक सहभागींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

सकाळपासूनच दोन्ही ठिकाणी योग दिनाबाबत उत्साहाचे वातावरण होते. सुरजागड खाणी परिसरात स्थानिक गावकरी, कामगार आणि सुरक्षा यंत्रणेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्याचवेळी कोनसरी प्रकल्पात देखील अधिकारी, महिला कर्मचारी, तरुण कामगार आणि मुलामुलींनी सामूहिक योग सत्रात भाग घेत मनोभावे सहभाग नोंदवला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या निमित्ताने एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी “योग ही भारताची जगाला दिलेली बहुमोल देणगी आहे,” असे सांगत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ‘एक पृथ्वी, एक आरोग्य – योगासह’ या थीमचा संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की, “योगामुळे शरीर आणि मन ताजेतवाने राहते. एलएमईएलच्या प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे व ग्रामस्थांचे आरोग्य जपण्यासाठी आम्ही अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत राहू.”

योग सत्र संपल्यानंतर उपस्थितांना एलएमईएलतर्फे अल्पोपहार आणि स्मृतिचिन्ह म्हणून कॅप वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे नियोजन सुटसुटीतपणे पार पडल्यानंतर सहभागींच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरजागड आणि कोनसरी परिसरातील औद्योगिक प्रकल्पामध्ये अशा सामाजिक व आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन होणे ही एक स्वागतार्ह बाब असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. योग दिनाच्या निमित्ताने औद्योगिक परिसरात शांतता, ऐक्य आणि आरोग्याची भावना दृढ झाल्याचे या उपक्रमामुळे स्पष्ट दिसून आले.

 

Comments are closed.