पावसाच्या विळख्यात अडकलेल्या १७ कुटुंबांना भाग्यश्री ताईंचा आधार : फुकट नगरात मदतीचा हात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी: आलापल्ली येथील फुकट नगर या वस्तीने २३ जुलै २०२५ रोजी अक्षरशः पावसाचे थैमान अनुभवले. मुसळधार पावसामुळे अनेक घरांत पाणी घुसले, संसाराचे कोपरे भिजले, आणि १७ कुटुंबांवर एकच आभाळ कोसळले. या संकटाच्या क्षणी कोणतीही राजकीय हिशेबशिवाय सामाजिक संवेदना आणि माणुसकीचा हात पुढे करत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) या कुटुंबांच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी तात्काळ या १७ कुटुंबांपर्यंत राशन किट पोहोचवले — केवळ धान्य नव्हे, तर आधार, विश्वास आणि आपलेपणाची जाणीव.
ही मदत फक्त सामानाची वाटणी नव्हती, तर संकटात सैरभैर झालेल्या मनांवर फुंकर घालणारा एक मूक धीर होता. भाग्यश्री ताईंनी अत्यंत नम्रतेने सांगितले, “आज पावसाचे संकट आहे, उद्या काही वेगळं असेल. पण तुमचं दुःख माझं आहे, आणि कोणतीही अडचण आली तरी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन.” त्या क्षणी ताईंचा आवाज फक्त आश्वासन नव्हता, तो त्या प्रत्येक घराच्या ओलसर भिंतींसाठी एक उबदार पाठिंबा होता.
या मदतकार्यावेळी नरेश मादेशी, विजय कोहराम, मडावी, सुंगधा, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार यांचाही सक्रिय सहभाग होता. प्रशासनाचा तांत्रिक प्रतिसाद काहीसा उशिरा असला, तरी या लोकांनी दाखवलेला माणुसकीचा प्रतिसाद अधिक जवळचा आणि खराखुरा वाटला.
फुकट नगरमधील ही घटना ही केवळ पूरग्रस्तांची नोंद नाही, तर सामाजिक नेतृत्वाची खरी ओळख काय असते, याचं उदाहरण ठरली आहे. राजकीय पदं, अधिकार किंवा जबाबदाऱ्या यापलीकडची ती एक ‘ताई’ म्हणून उभी राहिलेली भाग्यश्री — ही संवेदनेच्या पावसात उभी असलेली एक सावलीच ठरली.
Comments are closed.