Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर कार्यकुशलतेच्या मोडमध्ये — यवतमाळ वनविभागात सुधारणा व शिस्तीचा नवा अध्याय सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ओमप्रकाश चुनारकर,

यवतमाळ : सुमारे नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळ वनविभागाला अखेर एक सक्षम, दूरदृष्टी असलेला आणि कार्यकुशल अधिकारी मिळाले आहेत. २००६ बॅचचे आयएफएस अधिकारी डॉ. किशोर मानकर यांनी नुकतेच मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) म्हणून पदभार स्वीकारताच त्यांची काटेकोर कार्यपद्धती आणि शिस्तप्रिय धोरण स्पष्टपणे जाणवू लागली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदभार घेताच अवघ्या काही दिवसांतच त्यांनी यवतमाळ, पुसद, पांढरकवडा आणि वाशिम येथील उपवनसंरक्षक (DFO) आणि सहायक वनसंरक्षक (ACF) यांच्यासोबत सखोल आढावा बैठक घेऊन योजनांच्या अंमलबजावणीसंबंधी स्पष्ट सूचना दिल्या. विशेषतः महसूल विभागाच्या ताब्यात गेलेल्या ५ हजार हेक्टर वनजमिनीच्या पुनर्प्राप्तीसाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना २०१६च्या शासन निर्णयानुसार तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.

या बैठकीत राज्य योजना, जिल्हा योजना, टीएसपी, डीपीसीपी, खनिकर्म विकास योजना यासारख्या विविध योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित प्रकरणांचा आढावा, तसेच विकासाच्या दिशेने वाटचाल यावर भर देण्यात आला. यामध्ये सगळ्याच अधिकाऱ्यांची कार्यक्षमतेच्या कसोटींवर झाडाझडती झाली असून, वनवृत्तात आता एका नव्या कार्यसंस्कृतीची चर्चा सुरू झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रशासनच नव्हे तर समाजसेवेचाही ठसा..”

डॉ. मानकर हे केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे, तर एक जिव्हाळ्याचे सामाजिक नेतृत्व म्हणूनही परिचित आहेत. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात कार्यरत असताना त्यांनी वन्यजीव-मानव संघर्षावर नियंत्रण मिळवताना, ओडिशातून आलेल्या रानटी हत्तीच्या कळपावर तातडीने नियोजन करीत बंगालहुंन हुंल्ला टीम बोलावून यशस्वीपणे परिस्थिती हाताळली होती.

त्यांनी अनेकदा कष्टकरी आणि आदिवासी जनतेच्या संघर्षात थेट सहभाग घेत त्यांच्या मनात खाली बसून न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली. शेतकरी आणि गरीबांचे नुकसान टाळण्यासाठी प्रत्यक्ष मैदानी भेटी घेत वनविभागाचे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख रूप त्यांनी उभं केलं.

विचारपूर्वक नेतृत्वाचा अनुभव..

पेंच व्याघ्र प्रकल्पात सीसीएफ आणि फील्ड डायरेक्टर असताना त्यांनी Landsat-8 सॅटेलाईटच्या आधारे फायर सेंसिटिव्हिटी मॅपिंग करून वनआग प्रतिबंधात मोठे यश मिळवले.

‘डक काँजर्वेशन’ सारख्या पर्यावरणीय प्रशिक्षण कार्यशाळा राबवत त्यांनी वनकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, गस्तीदलांची यंत्रणा आणि ग्रामस्तरावर जनजागृती यामध्ये दर्जात्मक बदल घडवले.

नागपूर विभागात त्यांनी सीसीएफ (टेरिटोरियल), सीसीएफ (इव्हॅल्युएशन), सीएफ (प्लॅनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट) अशा महत्त्वपूर्ण पदांवर उत्तम कारकीर्द बजावली.

स्वतःचे वास्तव्यगृह निर्माण करणारा अधिकारी..

किरकोळ सत्ताधाऱ्यांपेक्षा वेगळ्या वाटेने चालणारे डॉ. मानकर हे समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे अधिकारी आहेत. त्यांनी निराधार, अनाथ, गरीब विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे वसतिगृह बांधून शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक गरीब विद्यार्थी आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून यामध्ये स्पर्धा परीक्षेत आयएएस, आयपीएस, वनसेवा आणि आरोग्य क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत.

त्याचप्रमाणे, शासकीय आरोग्य सुविधांपासून वंचित लाभार्थ्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम त्यांनी आपल्या सामाजिक उपक्रमातून संघटनेमार्फत सुरु ठेवले आहे.

एक दिशादर्शक नेतृत्व..

डॉ. किशोर मानकर यांचे नेतृत्व वनविभागासाठी केवळ प्रशासकीय शिस्त नव्हे, तर एक संवेदनशील, लोकाभिमुख आणि परिवर्तनवादी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या आगमनाने यवतमाळ वनविभागात नव्या कार्यसंस्कृतीची सुरुवात झाली आहे. त्यांनी उभारलेली नवी दिशा ही केवळ वनसंपत्तीच्या रक्षणापुरती मर्यादित नसून, माणसांच्या हक्काच्या आणि निसर्गाच्या सहजीवनासाठीची लढाई आहे.

Comments are closed.