Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई – खुनात सहभागी जहाल माओवादी अटक

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 7 सप्टेंबर : गडचिरोली पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवादीला हैद्राबाद (तेलंगणा) येथून गुप्त कारवाईत ताब्यात घेऊन अटक केली आहे. शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चा (वय 25, रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बीजापूर, छत्तीसगड) असे या माओवादीचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

नोव्हेंबर 2023 मध्ये अहेरी तालुक्यातील कापेवंचा गावात रामजी चिन्ना आत्राम या निरपराध शेतकऱ्याची हत्या करण्यात त्याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला अहेरी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 411/2023, कलम 302, 147, 148, 149, 120(ब) भादवी सह 3 व 27 भा.का. अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दलममधील कार्यकाळ

सप्टेंबर 2018 : मद्देड दलममध्ये भरती, डिसेंबर 2018 पर्यंत कार्यरत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डिसेंबर 2018 – 2022 : गडचिरोली डिव्हिजनमध्ये डीव्हीसीएम शंकर अण्णा ऊर्फ असामचा अंगरक्षक.

2022 – 2024 : पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

2020 : येडदर्मी जंगलात झालेल्या चकमकीत सहभाग.

2021 : मडवेली परिसरातील चकमकीत सहभाग.

2023 : वेडमपल्ली जंगलातील चकमकीत सहभाग.

2024 : चितवेली परिसरातील चकमकीत सहभाग.

2023 : कापेवंचा येथे झालेल्या खुनात प्रत्यक्ष सहभाग.

शंकर उर्फ अरुण हा 2024 मध्ये पेरमिली दलम संपूष्टात येण्यापूर्वी संघटना सोडून घरी परतला होता. काही महिने शेतीचे काम करून तो आंध्रप्रदेश व नंतर हैद्राबाद येथे काम करून राहत होता. गुप्त माहितीनुसार गडचिरोली पोलिसांनी 4 सप्टेंबर रोजी हैद्राबादेत कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, डीआयजी अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत बोरसे व सी-60 पथकाने केली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगावे. पोलिस प्रशासन त्यासाठी नेहमी तयार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.