Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

म्हाडाच्या गृहनिर्माण संस्थांना सेवा शुल्कावर सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 16 डिसेंबर:  म्हाडा वसाहतीच्या 56 गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून  वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी  गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीने प्रस्ताव तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

आज वर्षा येथील समिती कक्षात म्हाडा  वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवा शुल्कावर सूट देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बैठकीला परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार मंगेश कुंडाळकर, मुख्य सचिव संजीव कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी  राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर संबंधित अधिकारी उपस्थितीत होते.

निवासी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमीनीच्या थकीत सेवाशुल्कात सवलत देण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार अभय योजना तयार करून लवकरात लवकर  प्रस्ताव सादर करावा. तसेच भोगवटदार वर्ग -2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्याची स्थगिती उठवून कार्यवाही सुरू करण्यात यावी. असे निर्देश देण्यात आले.
बैठकीत स्वदेशी मिल कंपाऊडमधील कामगारांच्या घराबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे तसेच नेहरूनगर म्हाडा वसाहतीतील पोलिसांच्या सेवानिवास्थानाच्या अनुषंगाने चर्चा झाली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.