Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील पाटोद्याच्या राजकारणातून बाद

भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलाचा पराभव झाला तर मुलगीही पराभूत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

औरंगाबाद, दि. १८ जानेवारी:  संपूर्ण राज्यात आदर्श म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पाटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या पूर्ण पॅनलसोबतच त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. तब्बल 30 वर्षानंतर पेरे पाटील पाटोद्याच्या राजकारणातून बाद झाले आहेत.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. आज या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यासाठी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या धामधुमीत आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण या गावाची किर्ती संपूर्ण राज्यात घेऊन जाणारे भास्कर पेरे यांनी त्याचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. यामध्ये त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांनीसुद्धा निवडणूक लढवली होती. मात्र, येथे भास्करराव पेरे यांच्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाला आहे. त्यांच्या मुलीसह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.

11 जागा बिनविरोध

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या वर्षी पोटोदा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. कारण यावेळी भास्करराव यांच्या विरोधात पॅनल उभे केले होते. एकूण 11 जागांपैकी 8 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तिन जागांसाठी निवडणू झाली होती. मात्र या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांचे पॅनल पराभूत झाले आहे. येथील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी विजय मिळवला आहे.

पाटोदा येथे भास्करराव पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे यांच्याही पराभव झाला. त्यांना निवडणुकीत 186 मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दुर्गेश खोकड यांनी 204 मतं मिळवत निवडणूक जिंकली.

मागील कित्येक वर्षांपासून भास्करराव पेरे यांनी पाटोदा ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवलेली आहे. या काळात त्यांनी पोटादा गावाचा विकास करून गावाची किर्ती समस्त राज्यात पसरवली होती. त्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. मात्र, यावेळच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा समाना करावा लागला. भास्कर पेरे 30 वर्षांनंतर गावाच्या राजकारणातून बाद झाले आहेत.

मागील कित्येक वर्षांपासून भास्करराव पेरे यांनी पाटोदा ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवलेली आहे. या काळात त्यांनी पोटादा गावाचा विकास करून गावाची किर्ती समस्त राज्यात पसरवली होती. त्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. मात्र, यावेळच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा समाना करावा लागला. भास्कर पेरे 30 वर्षांनंतर गावाच्या राजकारणातून बाद झाले आहेत.

Comments are closed.