Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘चलो बुलावा आया है’ गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन

 प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं आज दिल्लीत दीर्घ आजाराने निधन झालं.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 22 जानेवारी:– मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नरेंद्र चंचल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंचल यांना लहानपणापासून भजन गाण्याची आवड होती. मातारानीची भजन ते लहानपणापासून गात असायचे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नरेंद्र चंचल यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1940 रोजी अमृतसरमध्ये एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला. ते एका धार्मिक वातावरणात मोठे झाले, ज्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच भजन कीर्तन गाणे आवडत होते. बऱ्याच वर्षांच्या स्ट्रगलनंतर नरेंद्र चंचल यांनी 1973 च्या ऋषी कपूर-डिंपल कपाडिया यांच्या बॉबी या चित्रपटासाठी एक गाणे गायले होते. यासाठी नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक पुरस्कार मिळाला.

Comments are closed.