Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरची तालुक्यात 18 पैकी 12 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा बोलबाला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची 22 जानेवारी:- कोरची तालुक्यातील 18 ग्रामपंचायत पैकी महाविकास आघाडीने 12 ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवून भाजपचा सुपडा साफ झाल्याने माहाविकास आघाडी फटाके फोडून आनंद साजरा केला .

तालुक्यातील 29 ग्रामपंचायत पैकी 18 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक घेण्यात आली होती . पण त्यापैकी 4 ग्रामपंचायत अविरोध आल्या. त्यात टेमली आदिवासी विद्याथी संघ आस्वलहुडकी ग्रामसभा या ग्रामपंचायत अविरोध आल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बेळगाव, बेतकाठी, , बोरी, कोचीनारा,मर्केकसा कोसमी-2,कोहका,मसेली,नवरगाव, अल्लीटोला सोनपूर, व नांगपूर अशा एकूण 13 ग्रामपंचायत मध्ये माहा विकास आघाडी ने विजय संपादन केला असून भाजपने फक्त कोडगुल नांदळी अरमुलकसा या 3 ग्रामपंचायतीवरव विजय मिळवून समाधान मानावे लागले तर बिहीटेकला मध्ये भाजपचे 4 माहाविकास आघाडी 4 व 1 अपक्षांने बाजी मारली आहे व अललीटोला ग्रामपंचायत मध्ये फक्त 5 जागेवर निवडणूक घेण्यात आली दोन जागा रिक्त आहे या पाच जागा मध्ये माहा विकास आघाडीचे 3 तर भाजप चे 2 उमेदवार निवडून आले आहेत तालुक्यातील बेतकठी, मसेली, बेळगाव, कोचिनारा, या ठिकाणी असलेल्या भाजपची सत्ता मतदारानी उधळून लावले आहे.

यावेळ माहा विकास आघाडीचे शामलाल मडावी, रमेश मानकर,प्रताबसिंग गजभिये मनोज अग्रवाल,नंदकिशोर वैरागडे,सदरुभाऊ भामानी , कृष्णा नरडंगे, हकीम उददीन शेख, जगदिश कपुरडेहीरीया, राजेश नैताम, राहूल अंबादे, प्रमेशवर लोहंबरे, केशव लेनगुरे ,राजाराम उईके, तुळशिराम ताळामी, कृष्णा कावळे, महेश झेरीया, बसंत भकता, कांनताराम जमकातन, ईद्रजी सहारे, डॉ नरेश देशमुख, राजु गुरनुले, तीलोचं हुपूंडी, मेहेरसिंग कांटेगे,देवालू कपुरडेहीया आदि कार्यकर्ते उपस्थित होते

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.