Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची केली पाहणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई दि.24:रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय  सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले आज रविवार दि.24 जानेवारी रोजी दुपारी  4 वाजता पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली.सिरम इन्स्टिट्यूटला नुकतीच अगा लागून 5 कर्मचारी मृत्युमुखी पडल्याची  दुर्घटना घटना घडली होती.  त्या पार्श्वभूमीवर ना रामदास आठवले आज सिरम इन्स्टिट्युट ला भेट देऊन पाहणी केली.

सिरम इन्स्टिट्यूट ला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करावी; यात मृत्यूमुखु पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देताना त्यांच्या कुटुंबातील एकास नोकरी द्यावी अशी सूचना मी आदर पुनावला यांना करणार आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना महामारीवर  औषधी लस बनवून  सिरम इन्स्टिट्युटने  देशासाठी अभिमानास्पद  कामगिरी केली असल्याने सिरम इन्स्टिट्युट एक महत्वाची इन्स्टिट्युट ठरली आहे.पंतप्रधानांनी सिरम इन्स्टिट्युट ला भेट देऊन कोरोना वरील लस बनविण्याच्या तयारी ची माहिती घेऊन या इन्स्टिट्युटच्या संशोधकांना संचालकांना  प्रोत्साहीत केले होते. त्यामुळे सिरम इन्स्टिट्युट ला अगा लागल्याची चर्चा मोठी झाली असून आज रविवारी  दुपारी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले सिरम इन्स्टिट्युटला भेट दिली.यावेळी रिपाइं चे माजी उप महापौर डॉ सिद्धार्थ धेंडे; परशुराम  वाडेकर;असित गांगुर्डे;  संजय सोनवणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.