Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रजासत्ताक दिनाला पोलीस स्टेशनमध्ये वृद्धाने घेतले पेटवून!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

संगमनेर, 26 जानेवारी : देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, संगमनेरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एका वृद्ध नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल शिवाजी कदम (वय 70) असं या व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेत अनिल कदम हे 60 टक्क्याहून जास्त भाजले गेले आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अनिल कदम यांनी तीन दिवसांपूर्वीच शहर पोलीस स्टेशनमध्ये 25 जानेवारी रोजी आत्महत्या करणार असल्याचे पत्र दिले होते. मात्र, त्याला आत्महत्यापासून परावृत्त करण्यात पोलिसांना अपयश आले होते. मागील वर्षी सुद्धा अनिल कदम यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला पण, प्रकरण न्यायालयात असल्यामुळे पोलिसांनी यात हस्तक्षेप करण्यास असमर्थता दर्शवली होता.  अखेर, आज सकाळी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन अंगावर रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.