Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिनेस्टाईलने पाठलाग करुन १७,८१,६०० रु. ची दारुसह मुदेमाल जप्त

गडचिरोली पोलीस विभागाची मोठी कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ३० मार्च : चामोर्शी तालुक्यातील गौरीपुर गावात देशी दारुच्या १३९ पेटया व विदेशी दारुच्या ५ पेटया दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारूचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले पिकअप वाहन असे १७,८१,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गडचिरोली  पोलीस विभागाने मोठी कामगिरी बजावली आहे.

दिनांक २९ मार्च २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर चामोशी हद्दीतील दारू तस्कर शंकर अन्ना हा त्याचे सहका-यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्हयातून मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी हरणघाट मार्गावर रात्रीदरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली असता दारुचे वाहतुक करीत असलेल्या पिक अप वैनने पोलीसांच्या इशा-यास न जुमानता बॅरिकेटस तोडुन पळ काढला परंतु पोलीसांनी क्षणाचा विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला, अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्याचे ताब्यातील वाहन जंगल मार्गाने तसेच पोस्टे चामोर्शी व पोस्टे आष्टी येथील वेगवेगळ्या गावात नेले.

परंतु पोलीसांनी १०० ते १२५ किमी सतत पाठलाग केल्याने वाहनचालक व त्याच्या साथीदाराने वाहन पोस्ट चामोर्शी हद्दीतील सोनापुर या गावाजवळ सोडुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन वाहनचालका सोबत असलेल्या अमित बारई रा. गौरीपुर ता. चामोर्शी यांस ताब्यात घेतले परंतु चाहनचालक राकेश मशीद रा. गौरीपुर ता. चामोर्शी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरुन फरार झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर वाहनात देशी दारुच्या १३९ पेटया व विदेशी दारुच्या ५ पेटया दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारूचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले पिकअप वाहन असे १७,८१,६००/- रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त केला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे चामोर्शी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम ३५३ भादंवि सहकलम ६५ (अ) १८(२), ८३ मदाका सहकलम १८४ मौवाका अन्वये आरोपी नामे शंकर अन्ना रॉय, राकेश मशीद व अमीत बारई यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करुन आरोपी नामे अमीत बारई यांस अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल,  अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन)  कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि राहुल आव्हाड, पोउपनि दिपक कुंभारे, नापोअं/ अकबर पोयाम, पोअं/ प्रशांत गरफड़े, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, मंगेश राऊत, सुनिल पुडावार, सचिन घुबडे, चानापोअं/ मनोहर येलम, शगीर शेख यांनी केलेली आहे.

हे देखील वाचा : 

“त्या मुजोर” वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यामुळे राम भक्तांविरुद्ध पोलिस तक्रारीने आलापल्लीत नवा वाद

रामनवमीच्या दिवशी मोठी घटना, मंदिरात पूजा सुरु असतानाच 25 भाविक पडले विहिरीत

Comments are closed.