Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुन्हा वाघाने घेतला एका मजुराचा बळी; वाघांच्या वाढत्या हल्ल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

रामाळा(आरमोरी)परिसर वाघाच्या दहशतीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आरमोरी, दि. ८ ऑक्टोंबर : वाघ आता लोक वस्तीत घुसून धुमाकूळ घालण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतीत प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. दैनंदिन कामासाठी शेतकऱ्यांना शेतात जावेच लागते. शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन शेतात जावे.विनाकारण जंगलात जाऊ नये, या सूचना योग्य आहे. परंतु प्रशासन म्हणून वन संरक्षक अधिकारी काय जबाबदारी घेतात. हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे. हल्ली हिंस्त्र पशूंच्या वाढत्या हल्ल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली. हिंस्त्र वाघाच्या हल्ल्यात मयत झालेल्या त्या मयताच्या नातेवाईकांना ३० हजार रुपये प्रशासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात आले आहे . व्यक्ती हल्ल्यात मयत झाल्यावर पैसे देणे हा त्यावरील उपाय नाही. त्यासाठी वनविभागाने लोकांच्या रक्षणासाठी संरक्षण कडे उभारणे. जागता पहारा कार्यान्वित करणे. या गोष्टी केल्याचं पाहिजेत. नुकताच रामाळा – वैरागड रोड लगत वाघाने केलेल्या हल्ल्यात एका मजुराचा बळी गेला आहे. त्या बाबतची हकीगत अशी ‘

पशूंच्या धान्य कापणीच्या कामाला वेग आलेला असल्याने धानाच्या कडपा जमा करण्यासाठी शिधीची गरज पडते त्याकरिता रामाळा (आरमोरी)येथील आनंदराव दुधबळे हे आपल्या सहकाऱ्यासोबत सकाळी ८ वाजता वैरागड रोडवर कूप क्र. ४१ येथे शिंद तोडत असताना वाघाने हल्ला करून दुधबळे यांचा जीव घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व तीन मुली असा मोठा आप्त परिवार आहे
वरील घटनेमुळे रामाला परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना धानाची कापणी, मळणी कशी करावी हा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

आणखी एका ठाकरेंची होणार राजकारणात एन्ट्री ?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सिरोंचा वनविभागातील दुर्मिळ गिधाड संवर्धनासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न .

सिरोंचा वनविभागात वन्यजीव सप्ताहाचे यशस्वी आयोजन .

 

Comments are closed.