शिकारीसाठी सोडला विद्युतप्रवाह : युवकाचा झाला मृत्यू
चामोर्शी तालुक्यातील वसंतपूर येथील युवकाचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी जवळच्या वसंतपूर फार्म कॉम्प्लेक्सच्या जंगलात वन्यप्राण्यांचे शिकारीसाठी टाकलेल्या विद्युत तारेच्या धक्क्याने वसंतपूर येथील दीपक दिलीप सरकार, वय २१ यांचा मृत्यू झाला तर आकाश आशुतोश मिस्त्री, वय १७ हा युवक गंभीर जखमी आहे. सदरची घटना दि. २३ डिसेंबरला रोजी घडली.
वसंतपूर गावातील काही अज्ञात आरोपींनी वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी संकुलाच्या जंगलात विद्युत तारा टाकल्या होत्या. त्यादरम्यान वसंतपूर येथील दीपक दिलीप सरकार, वय २१ व आकाश आशुतोश मिस्त्री, वय १७ हे दोघे दुचाकीवर बसून जंगलातील हातभट्टीवर मोहाची दारू गाळण्यासाठी जात होते. त्यादरम्यान, शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दीपक दिलीप सरकार, याचा जागीच मृत्यू झाला तर आकाश आशुतोश मिस्त्री हा युवक गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचार करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याचेवर उपचार सुरु आहेत. सदर प्रकरणी अज्ञात आरोपीवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
वसंतपूर गावातील काही अज्ञात आरोपींनी वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी टाकलेल्या विद्युत तारेच्या स्पर्श झाल्याने या प्रकरणी निष्काळजीपणा करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात आरोपीवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि. विशाल काळे यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.
हे देखील वाचा,
न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’ वर झळकला; वाशीमच्या देपूळ येथील ज्ञानेश्वर आघाव..
Comments are closed.