Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘लोकस्पर्श’ न्युज चा दणका… आदिवासी महिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून रस्ता खोदल्या प्रकरणी अखेर आरोपींविरोधात गुन्हा दाखल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वसई, दि २५ नोव्हेंबर : विरार पूर्वेच्या टोकरे कातकरी पाडा येथील गरीब आदिवासी महिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून रस्ता खोदल्या प्रकरणी अखेर आरोपी विकास नाईक आणि त्याच्या ६ गुंडांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाला सर्वप्रथम लोक स्पर्श न्युजने वाचा फोडली आणि याबाबतचे वृत्त प्रसारित केले. आदिवासींवर झालेल्या अत्याचाराची बातमी प्रसारित होताच याबाबत पोलिसांकडून देखील सदर वृत्त चुकीचे असल्याचे सांगत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक स्पर्श न्युजने ठाम भूमिका घेतल्याने व श्रमजीवी संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर रात्री उशिरा आरोपींविरोधात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मुख्य आरोपी विकास नाईक याला अटक देखील केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वसई येथील आदिवासी महिलांना पोलिसांकडून निर्दयी पणे मारहाण झाल्याची घटना ताजी असताना आता, आणखी एका आदिवासी अत्याचाराची घटना समोर आली आहे. टोकरे कातकरी पाड्यावर जाण्यासाठी असलेल्या पारंपरिक वहिवाटीचा रस्ता विकास नाईक याने जेसीबीच्या सहाय्याने जबरदस्तीने खोदला. तसेच यावेळी त्यास विरोध करणाऱ्या महिलांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून, धक्काबुक्की करत ठार मारण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप पिडीत महिला केला होता.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रकरणाचीदखल घेत संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शकाची श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र रोज, टोकरे विभागाचे झोन प्रमुख सुभाष आळवे यांनी पिडीत महिलांसोबत विरार पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दखल केली. यावेळी टोकरे गावकमीटी प्रमुख अनिल तुंबडा, विलास मोराघे, साईनाथ खरपडे आणि निलेश वाघ हे उपस्थित होते.

संबंधित बातमी : वसईमध्ये आदिवासींवरील अत्याचाराची मालिका सुरूच…

विरार पूर्वेच्या टोकरे कातकरी पाडा येथील गरीब आदिवासी कातकरी बांधवावर विकास नाईक आणि इतर ५ ते ६ गुंडांकडून कातकरी पाड्यावर जाणारा रस्ता जबरदस्तीने दामदाटी जेसीबी मशीनच्या सहायाने जबरदस्तीने खोदला. रस्ता खोदल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे . हा रस्ता पारंपरिक वहिवाटीचा असून १४ वा वित्त योजनेतून ग्राम पंचायतीमार्फत बनवण्यात आला आहे. मात्र हा सरकारी रस्ता खोदल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी विकास नाईक व त्याच्या साथीदारांविरोधात एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र रोज यांनी दिला होता.

 

हे देखील वाचा : 

अखेर एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर निघाला तोडगा; एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ५ हजार रुपयांची वाढ

 

सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात आघाडी सरकार अपयशी – भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांची घणाघाती टीका

राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला होणार मतदान

Comments are closed.