Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भयंकर ! लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची पार्टनरने निघृण हत्या करून शरीराचे तुकडे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 मुंबई दि, 8 : मिरारोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, आता मिरारोड महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या  ३६वर्षीय महिलेच्या शरिराचे तुकडे करुन ते आरोपीने कूकरमध्ये शिजवले. हे शिजवलेले तुकडे तो कुत्र्यांना खाऊ घालत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

हत्येसाठी वापरण्यात आलेलं घरातील सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले .आरोपी मनोज साहानी हा लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे तुकडे तो कुत्र्यांना खाऊ घालत होता अशीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मनोज याला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. एवढे सगळे केले तरी आरोपीच्या चेहऱ्यावर चौकशी दरम्यान कसलेच भाव दिसून आले नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दोन आठवड्यांतील ही दुसरी घटना..

एका महिलेची हत्या करुन मृतदेह कापल्याच्या दोन आठवड्यांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेत, मीरा रोड येथील एका  36 वर्षीय महिलेची तिच्या लिव्ह-इन-पार्टनरने हत्या केल्याचा आरोप आहे. ज्याने शरीराचे अनेक तुकडे केले आणि त्यातील काहींची विल्हेवाट लावली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी संध्याकाळी पोलीस मनोज यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना फक्त महिलेचे पाय दिसले. आरोपी मनोज सहानी (56) याला त्याच्या फ्लॅटमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली. महिलेचा  खून करुन मृतदेहाचे तुकडे करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 फ्लॅट क्रमांक ७०४ मधून दुर्गंधी आली आणि…

नया नगर पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला सरस्वती वैद्य ही मनोज सहानी याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. मिरारोड येथील गीता नगर येथे हे जोडपे तीन वर्षांपूर्वी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना इमारतीतील रहिवाशांचा फोन आला. त्यांनी फ्लॅट क्रमांक 704 मधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. पोलीस फ्लॅटवर पोहोचल्यावर सहानी यांने दरवाजा उघडला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले. पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना फक्त एका महिलेचे पाय दिसले.

हे देखील वाचा, 

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य दूरदृष्टीचे – राज्यपाल रमेश बैस

दिवा परिसरातील 610 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न

आगरी कोळी वारकरी भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.