Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र गडचिरोली येथे “शिक्षकांची पर्यावरण शिक्षण” कार्यशाळा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : दि. 2 जानेवारी 2025 ला विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एस.टी.आर.सी.) गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पर्यावरण शिक्षण उपक्रमा अंतर्गत एक दिवसीय शिक्षकांची कार्यशाळा कार्यशाळा घेण्यात आली. ज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील निवडक 15 शाळांमधून शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी झाले होते.

एस.टी.आर.सी. गडचिरोली व चंद्रपूर भागात मागील १० वर्षापासून उपजीविका, तंत्रज्ञान व क्षमता विकासावर आधारित अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत. त्यातीलच ‘शालेय पर्यावरण शिक्षण व संवर्धन’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास २०२३ पासून सुरवात करण्यात आली. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणातील विविध घटक जसे, जैवविविधता, वने व वन्यजीव, माती व पाणी परीक्षण, रानभाज्या, गांडूळ खत निर्मिती, वातावरणातील बदल अशा अनेक विषयांचे “अनुभवात्मक शिक्षण” मागील वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील १० शाळांमधील ३७४ मुलांनासोबत घेण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पर्यावरण शिक्षण उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद बघता यावर्षी सदर उपक्रम ५०० ते ६०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा गोंडवाना विद्यापीठाचा मानस आहे. आयोजित कार्यशाळेत विविध चर्चेच्या व खेळाच्या माध्यमातून शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धन याकरिता ‘अनुभवात्मक शिक्षणाची’ आवश्यकता यावर विस्तृत चर्चा करण्यात आली ज्यामध्ये उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यशाळेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे मा.कुलसचिव डॉ. अनिल हिरेखान यांच्या हस्ते करण्यात आले असून कार्यक्रमास नवोपक्रम, नव संशोधन व साहचर्य विभागाचे संचालक प्रा. मनीष उत्तरवार तथा एस.टी.आर.सी चे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख श्री.आशिस घराई आदी उपस्थित होते तसेच शैक्षणिक संशोधन क्षेत्रात (Education Research) अनुभव असलेल्या डॉ.अस्मिता रेडीज , यांनी कार्यशाळेमध्ये “प्रभावी शिक्षण पद्धती” यांवर चर्चा घडवून आणली. कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आणि एस.टी.आर.सी. च्या संपूर्ण चमू ने आपले मोलाचे योगदान दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा, 

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता !

गडचिरोली पोलीसांनी 21,00,400/- रुपयांचा अवैध दारु व मुद्देमाल जप्त.

Comments are closed.