Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 25, डिसेंबर :- हिंदी मालिकेतील 24 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री तुनीषा शर्मानं मालिकेचं शूटिंग सुरू असलेल्या स्टुडिओतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यामधल्या कामण भागातल्या भजनलाल स्टुडिओत सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दस्ताने काबुल या हिंदी मालिकेच्या सेटवर असलेल्या मेकअप रूम मध्ये 24 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री तुनीषा शर्मानं शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.अलिबाबा दास्ताने काबुल या मालिकेत ती मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत होती. तिच्या या आत्महत्येमूळे सिरीयल क्षेत्रात एकच खळबळ आणि शोककळा पसरली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तुनीषा ही शनिवारी सिरीयलच्या सेटवर आली होती. पण ती सेटवर दिसली नाही. त्यानंतर तिचे सहकारी तिला बोलावण्यासाठी गेले असता दरवाजा ठोठाऊन सुद्धा तिने दरवाजा न उघडल्यानं दरवाजा तोडण्यात आला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचं पाहून सर्व सहकाऱ्यांना धक्का बसला. त्यांनतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. मात्र या अभिनेत्रीनं आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊन का उचललं, त्यामागचं नेमकं कारण काय याबाबत वालीव पोलीस तपास करत आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://fb.watch/hCCWKukgvg/

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.