Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

८२ रुग्णांना नको दारूचे व्यसन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : मुक्तिपथ तर्फे तालुका पातळीवर आयोजित व्यसन उपचार तालुका क्लिनिकच्या माध्यमातून विविध तालुक्यातील ८२ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना तालुका पातळीवर व्यसन उपचार मिळावे, यासाठी मुक्तिपथतर्फे बाराही तालुक्यात नियोजित दिवशी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञ समुपदेशकाच्या मार्फतीने योग्य सल्ला देत औषोधोपचार केला जातो.आतापर्यंत अनेक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेऊन आपल्या जीवनातून नाहीसा झालेला आनंद पुन्हा निर्माण केला आहे.
घरातील कर्त्या माणसाचे व्यसन सुटल्याने अनेक कुटुंब उध्वस्त होता होता सावरले आहेत. मागील आठवड्यात आरमोरी १५, एटापल्ली १४, गडचिरोली २१, सिरोंचा ५, मुलचेरा १२ तसेच तालुका क्लिनिकल १५ पेशंटनी भेट देऊन उपचार घेतला. या विविध तालुका मुख्यालयी नियोजित दिवशी घेण्यात आलेल्या तालुका क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ८२ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.