Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘सर्च’रुग्णालयात विविध आजारावर होणार तपासणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि.१०: धानोरा तालुक्यातील चातगाव येथील “सर्च” रुग्णालयात ११ मे  २०२४ रोज शनिवारला पोटविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे.पोटविकार ओपीडी करीता नागपूर येथील  पोटविकार तज्ञ डॉ.सिद्धार्थ धांडे यांच्या सहकार्याने पोटविकार ओपीडीमध्ये तपासणी आणि एंडोस्कोपी  व फाईब्रोस्कॅन तपासणी करण्यात येइल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फायब्रोस्कॅन चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी यकृताच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. हे यकृताची कडकपणा आणि लवचिकता मोजते, जे फायब्रोसिस आणि सिरोसिस सारख्या यकृत रोगांची उपस्थिती आणि तीव्रता याबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करू शकते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यकृताची स्थिती निर्धारित करण्यासाठी हे उपकरण कंपनाचा वेग मोजते. हिपॅटायटीस सी, यकृत रोग आणि अल्कोहोल-संबंधित यकृत रोग यासारख्या परिस्थिती असलेल्या रुग्णांमध्ये यकृताच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही चाचणी सहसा वापरली जाते. तसेच पचनसंस्थेशी निगडीत विकाराचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी उपचार केल्या जातील.

पोटातील अल्सर, गिळण्यामध्ये अडचण व वेदना होणे, पित्ताशयातील खडे, छातीत जळजळ, पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, शौचातून रक्त पडणे, कावीळ (पांढरी व पिवळी ) रक्ताची उलटी, असामान्य आतड्याची हालचाल,मळमळणे,आतड्या मधील सुज,पातड शौच, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, पोटात पाणी ही पोटविकाराची लक्षणे असू शकतात. पाचन चिन्हे आणि लक्षणे कशामुळे उद्भवत आहेत हे निर्धारित करण्यासाठी एंडोस्कोपी तपासणी केल्या जाईल.

 गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी  गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे.
ओपीडीमध्ये  ईसीजी, एक्सरे, फाईब्रोस्कॅन व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०%  सवलत प्रदान करित आहे. तसेच एंडोस्कोपी  प्रोसीजर १००%  मोफत दरात करण्यात येत आहे, तरी शनिवार  ११ मे २०२४ रोजी होणा-या पोटविकार  विशेष तपासणी शिबिराचा लाभ, जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. जाताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन जावे.
हे देखील वाचा, 

उष्माघात प्रतिबंधासाठी ‘वाटर बेल’ संकल्पना राबवा – आयुषी सिंह

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

बालविवाह थांबविण्यासाठी सजग राहा; हेल्प लाईन १०९८ वर संर्पक साधण्याचे प्रशासनाचे आवाहन

Comments are closed.