Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

1 लाख 30 हजार लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ; दोघांना अटक

तेंदू पानाच्या वाहतुकीकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १ लाख ३० हजारांची लाच मागणाऱ्या दोघांना एसीबीने अटक केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 25 ऑगस्ट : तेंदूपानांची वाहतूक करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एका तेंदू कंत्राटदाराकडून १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.  प्रतीक चन्नावार हा प्रभारी गटविकास अधिकारी असून, संजीव कोठारी हा कंत्राटी पेसा समन्वयक, तर अनिल गोवर्धन हा खासगी व्यक्ती आहे याच्यावर  गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या कंत्राटदाराने गोविंदगाव येथील तेंदूपानांचे युनिट लिलावाद्वारे खरेदी केले होते. या तेंदूपानांची वाहतूक करण्याकरिता पंचायत समितीकडून नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. हे प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी यांनी कंत्राटदारास १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल सापळा रचला असता अनिल गोवर्धन याच्या माध्यमातून तक्रारकर्त्याकडून १ लाख ३० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार फरार आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.