Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यातील 10 विद्यार्थ्यांना मिळणार व्यवसायिक पायलट प्रशिक्षण

व्यवसायिक पायलट प्रशिक्षण देण्यात येणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, 29जुलै – नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थ्यांना व्यवसायिक पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने http://chandaflying.govbharti.org या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याबाबतची सविस्तर माहिती www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील स्थायी रहिवासी यांना घेता येईल. तसेच याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याकरीता अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतले दिव्यांग कल्याणाचे निर्णय दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप दिव्यांगांसाठी सर्व महापालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करावे कर्ज मर्यादा ५० हजारांवरून अडीच लाख करणार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.