Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जाफ्राबाद येथे ४२ ड्रम साखरेचा सडवा नष्ट

बामणी उप पोलीस स्टेशनची कारवाई

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

 सिरोंचा, 22 एप्रिल :सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद शेत शिवारात दडवून ठेवलेला ४२ ड्रम साखरेचा सडवा, दारू व साहित्य असा एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई बामणी उप पोलिस स्टेशन व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या  केली.जाफ्राबाद गावात एकूण 8 विक्रते आहेत. या विक्रेत्यांच्या माध्यमातून मोयाबीनपेठा, रेंगूठा, नर्सिहापल्ली, बोगुटागुडम, पीरमेडा या  गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. गावातील विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी शेतशिवारात मोठ्या प्रमाणात साखरेचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथक व मुक्तिपथ तालुका चमूने शोधमोहीम राबविली असता, ४२ ड्रम साखरेचा सडवा, ३० लिटर दारू व दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्य असा एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून दारूविक्रेत्यांना  चांगलाच धडा शिकवण्यात आला. सदर कारवाई पोलिस उप स्टेशनचे प्रभारी अधिकारी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पार्दी, पोलिस कर्मचारी व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://youtu.be/6d250_gPNTY
https://youtu.be/f69mPHSxMLg

Comments are closed.