Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोर्ला येथे शासकीय योजनांच्या जत्रेत 9320 नागरिकांनी घेतला लाभ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 21 एप्रिल : शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी हा हेतु समोर ठेवून शासकीय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियान गडचिरोली तालुक्यामध्ये पोर्ला येथे दिनांक 20 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. संजय मीणा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आकांक्षीत जिल्हा योजनेअंतर्गत नागरिकांचे लाभ वितरण प्रणाली तयार करण्यात आली असुन सदर प्रणालीचा वापर करुन ज्या पात्र नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळला नव्हता त्या नागरिकांची यादी तयार करुन शासकीय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियान गडचिरोली तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. पोर्ला येथील अभियानाची तयारी म्हणून दिनांक 01 एप्रिल पासून नागरिकांकडुन अर्ज भरुन घेण्यात आले होते.

नागरिकांनी CSC केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजणा व सेवा मध्ये 462 जातीचे प्रमाणपत्र, 899 उत्पनाचे दाखले, 331 वय व अधिवास, 17 नॉनक्रिमीलीअर, 1772 शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, 32 संजय गांधी योजना, 106 श्रावणबाळ योजना, 516 नविन व दुय्यम रेशन कार्ड, 79 Jobcard यांचे Online अर्ज मोफत दाखल करुन नागरिकांना मोफत लाभ वितरण करण्यात आले. तसेच कृषी विभागामार्फत 197 मृदा आरोग्य पत्रिका, 02 ट्रॅक्टरचे अभियानाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाने 201 नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आयुष्मान कार्ड (Gold card) 3497 बनवुन नागरिकांना वाटप करण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत बॅका मार्फत राबविण्यात येणारे सामाजिक सुरक्षा योजना मध्ये PM सुरक्षा योजना चे 251 व PM जीवन ज्योती योजना चे 112 व PM जनयोगी योजनाचे 146 अर्ज नागरिकांकडून भरुन घेण्यात आले. व सदरच्या सर्व नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागामार्फत बिरसामुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत 20 नागरिकांना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंन योजना अंतर्गत नाकरिकांना लाभ देण्यात आला. तसेच ग्रामपंचायत पोर्ला मार्फत 92 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. शालेय शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत मानवविकास योजने अंतर्गत 37 मुलींना सायकल वाटप करण्यात आले. व 148 मुलींचा दैनिक उपस्थिती भत्ता प्रदान करण्यात आला. मॅट्रीकपुर्व सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीयोजना अतर्गत 229 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. तसेच 17 विद्यार्थ्यांना गुणवंत शिष्यवृत्ती योजना, 33 विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क परत करण्यात आले.

मस्य व्यवसाय विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या मस्य व्यवसाय साधनावर अर्थ सहाय योजने अंतर्गत 22 नागरिकांना लाभ प्रदान करण्यात आला. तसेच 5 नागरिकांना विज जोडणी महाराष्ट्र विद्युत वितरण विभागामार्फत देण्यात आले. कौशल्य विभाग गडचिरोली अतर्गत 10 तरुणांची कौशल्य विकास प्रशिक्षण करीता नोंद करण्यात आले. तसेच गडचिरोली उप अधिक्षक भुमि अभिलेख विभागा मार्फत 4 नागरिकांना रिनंबरींग देण्यात आले. शासकीय योजनाची जत्रा व महाराजस्व अभियान अंतर्गत पोर्ला येथील अभियानाला एकुण 9320 नागरिकांना लाभ देण्यात आला तसेच विविध योजनांची माहिती व जनजागृती अभियान स्थळी करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शासकिय योजनांची जत्रा या कार्यक्रमांचे उद्घाटन महेंद्र गणवीर तहसिलदार, गडचिरोली यांनी केले व बसवराज मास्तोळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, मारोतराव इचोडकर माजी पंचायत समिती सभापती, विजय दशमुखे माजी पंचायत समिती सदस्य यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्थळी श्रीमती निवृत्ता राऊत सरपंच पोर्ला, डॉ. सुनिल मडावी तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली व इतर तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते. पोर्ला येथे आयोजीत शासकीय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियान संजय मीणा जिल्हाधिकारी, गडचिरोली, व डॉ. मैनक घोष उप विभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालय, गडचिरोली व तालुका स्तरीय विविध शासकीय विभागाच्या सहकार्याने यशस्वी पणे राबविण्यात आला असे तहसिलदार, गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.