Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरमोरीतील माजी विद्यार्थाने परराज्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्या मुख्याध्यापिकेला केली वैद्यकीय मदत

  • युवक काँग्रेसचे महासचिव सारंग जांभुळे यांनी चक्क आरमोरीतून मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथे केली मदत.
  • रेमडीसीवीर इंजेक्शन लवकरात लवकर मिळावी म्हणून केली धडपड.
  • कोरोना काळात मदतीचा हात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. ३ मे: देशातील विविध भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्याने  देशातील विविध भागात त्याचा तुटवडा भासत आहे. अशा स्थितीत इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. असाच प्रकार मध्यप्रदेश राज्यातील होसिंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शिक्षिकेला रेमडेसिवीर इंजेक्शन ची गरज भासली होती. मात्र अनेक प्रयत्न करूनही इंजेक्शन मिळाली नव्हती. ही बाब आरमोरी येथील सदर शिक्षिकेच्या माजी विद्यार्थ्यांला कळताच त्यांनी धडपड व कसोशीने प्रयत्न करून मध्यप्रदेशात उपचार घेत असलेल्या शिक्षिकेला आरमोरी येथून मदत पोहचवून त्या शिक्षिकेला रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते हे गुरू आणि शिष्यासारखे असते. ज्या शाळेच्या चार भिंतीच्या आत शिस्त व संस्कार व पाठ्यक्रमाचे धडे घेणारे अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालय सोडल्यावर हे नाते विसरून जातात. मात्र आरमोरी येथील सारंग जांभुळे या विद्यार्थ्याला अपवाद ठरला आहे. या विद्यार्थ्याला दुसऱ्या राज्यात उपचार घेत असलेली आपली जुनी मुख्यध्यापिकेला रेमडेसिवीर इंजेक्शन ची  गरज आहे. तिच्या नातेवाईकांनी प्रयत्न करूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले नसल्याने आपल्या मुख्याध्यापिकेचा जीव धोक्यात आहे. हे माहीत होताच त्याला रहावले नाही आणि त्याने आरमोरीतुन प्रयत्न करून शेकडो किमी अंतरावर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुख्यध्यापिकेला वेळेवर मदत उपलब्ध करून देऊन तिचा जीव वाचविण्यास मदत केली आहे.

सण २०११ ते २०१६ पर्यंत ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद स्कूल येथे शिक्षण घेणाऱ्या आरमोरी येथील सारंग जांभुळे याला शिक्षण घेतेवेळी प्राचार्य असलेल्या सिस्टर नव्या रोज यांना कोरोना संसर्ग आजार झाल्याने त्यांना मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथील जोसेफ हास्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना डॉक्टराच्या सल्ल्यानुसार रेमडेसिवीर इंजेक्शनची नितांत गरजेचे होती. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी खूप प्रयत्न केले परंतु इंजेक्शन मिळत नव्हते त्यामुळे इंजेक्शन अभावी तिचा जीव धोक्यात आला आहे. ही बाब आरमोरी येथील सारंग नरेंद्र जांभुळे, या आरमोरी विधानसभा युवक कांग्रेसच्या महासचिव असलेल्या माजी विद्यार्थ्याला कळतातच सोसिअल मीडियाच्या माध्यमातून युवक काँग्रेस तर्फे कोविड-१९ च्या काळात लोकांच्या मदतीसाठी सुरु केलेली sosiyc च्या तेथील पदाधिकारींचे नाव नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क केला व त्यांना विनंती करून मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली व सदर ह्या पेशंट ची माहिती त्यांना दिलीआणि लगेच प्रशांत पराशर #sosiyc  चे पधाधिकारी यांनी सारंग यांनी केलेली मागणी ऐकली आणि दुसऱ्या दिवशी रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांला उपलब्द करून दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आजच्या कोरोनाच्या स्थितीत एखादा रुग्ण तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाला आपण मदत करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे मात्र शेकडो किमी अंतरावर दुसऱ्या राज्यात उपचार घेणाऱ्या एका माजी शिक्षिकेला आरमोरी येथून मदत उपलब्ध करून देणे ही अतिशय कठीण बाब असतांना ही धडपड व प्रयत्न करून रुग्णाला मदत पोहचवून शिक्षिकेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळेच शिक्षिका नव्या रोज यांना रेमडेसिवीर इंजेक्शन भेटण्यास त्यांच्याच विध्यार्थी सारंग नरेंद्र जांभुळे च्या साह्याने मदत झाली आहे.

Comments are closed.