पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगावच्या डोंगरावर हत्तींचा कळप स्थिरावला !
३१ हत्तींचा वावर असून हत्तींचा कळप मरेगाव उपक्षेत्र व रांगी उपक्षेत्राच्या सीमावर्ती भागात स्थिरावले आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वडसा वनविभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगाव डोंगर मंदिर परिसरातच हत्तींचा वावर आहे. या हत्तींच्या मागावर मरेगाव उपक्षेत्रातील कर्मचारी, वनमजूर तसेच हुल्ला टीम व स्वतः कर्तव्यावर आहे, विशेष म्हणजे, मागील वर्षी सुध्दा याच भागात हत्तींच्या कळपाने एन्ट्री केली होती.
गडचिरोली : गडचिरोली वनवृतात गेल्या वर्षभरापासून ओरिसा राज्यातून छत्तीसगड मार्गे जिल्हयात दाखल झालेले वडसा वनविभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगाव- रांगीच्या डोंगर परिसरात रानटी हत्तींनी प्रवेश केला असून गेल्या पाच दिवसांपासून बस्थान मांडलेले आहे. रानटी हत्ती गतवर्षी २१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून स्थिरावले असून मागील महिनाभरपासून पोरला वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींच्या कळपाचा समावेश आहे सध्या ३१ हत्तींचा वावर असून हत्तींचा कळप मरेगाव उपक्षेत्र व रांगी उपक्षेत्राच्या सीमावर्ती भागात स्थिरावले आहे.
सध्या हत्ती जंगल परिसरातच फिरत आहे. शेतकऱ्यांची सध्यातरी पिकांची नुकसान केली नसली तरी शेतकरी वर्गात जंगली हत्ती आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . सध्या शेतशिवारात बहुतांश शेतकऱ्यांची धान मळणी झालेली असून गावालगत असलेल्या शेतातीलच मळणी शिल्लक आहे. वनालगतच्या शेतातील धानाची मळनी झालेली असल्याने हत्तींपासून होणारे नुकसान टाळले गेले आहे.
हत्तींच्या कळपाने मागील तीन दिवसांपूर्वी पिपरटोला येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ट्रॅक्टरमध्ये भरलेले धानाचे पोत्याची नासधूस केली होती. त्यानंतर हत्ती बेलगावच्या जंगलात निघून गेले. त्यानंतर हत्तींनी बेलगाव येथील रामदास तानू कोठारे यां शेतक-याचे शेतातील ठिंबक सिंचनाचे पाइप व स्प्रे पम्पची मोडतोड करून भेंडीपीक तुडविले होते. ही नासधूस केल्यानंतर हत्तींनी रांगीच्या दिशेने मोर्चा वळविला.
सध्या बेलगाव डोंगर मंदिर परिसरातच हत्तींचा वावर आहे. या हत्तींच्या मागावर मरेगाव उपक्षेत्रातील कर्मचारी, वनमजूर तसेच हुल्ला टीम व स्वतः कर्तव्यावर आहे, अशी माहिती मरेगावचे क्षेत्रसहायक राजेंद्र समर्थ यांनी दिली. विशेष म्हणजे, मागील वर्षी सुध्दा याच भागात हत्तींच्या कळपाने एन्ट्री केली होती.


Comments are closed.