रानटी हत्तीचा कळप कोजबी शेतशिवारात
कापणीला आलेल्या धानाची पायाने तुडविल मोठया प्रमाणात नुकसान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : दि. ९ , पोरला वनपरिक्षेत्रातील सिर्सीच्या जंगलातून रानटी हत्ती चा कळप रात्री कोज्बी शेतशिवारात दाखल झाला. या कळपाने कोजबी शेतशिवारात धान पिकाची मोठया प्रमाणात नासाडी केली आहे. मागील महिनाभरापासून हत्तीचा उपद्रव होत नसल्याने शेतकर्यांनी व वन विभागाचे कर्मचारी यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु सदर हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यतील सावली वन परीक्षेत्रातून वापस गडचिरोली जिल्हयात आल्याने शेतकऱ्याचे कापणीस आलेल्या धान पिकाची मोठया प्रमाणात नुकसान करत आहेत.
वन विभागाने रानटी हत्तीचा योग्य तो बंदोबस्त करावा किवा हत्तींना या शेतशिवारातून जंगल परिसरात हाकलून लावावे, व झालेल्या धान पिक नुकसानीची नुकसान भरपाई तात्काळ वन विभागाने दयावी, अशी तीव्र भावना लोकांनी व्यक्त केली.
Comments are closed.