Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आष्टी पोलिसांची मोठी कारवाई, चारचाकी वाहनासह 11,22,000/- रुपयाचा अवैध दारु जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 31ऑगस्ट : आष्टीचे प्रभारी अधिकारी कुंदन गावडे यांना मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन  मार्कंडा कंसोबा फाटा येथे नाकाबंदी करीत असतांना, गोंडपिपरी ते आष्टी या मार्गे बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र. एम एच 30 ए बी 2602 ही आल्याने सदर वाहनास पोलीस स्टाफने थांबविण्याचा ईशारा दिला. परंतू वाहन चालक वाहन न थांबविता आलापल्ली रोडने निघुन गेला. पोलीसाने वाहनाचा पाठलाग केला असता, बोलेरो पिकअप  चा चालक चंदनखेडीचा रस्त्यावर वाहन उभी करुन जंगलात पळुन गेला.

पोलीसाने वाहनाची  तपासणी केले असता, त्यामध्ये 90 एम एल मापाचे 55 सिलबंद बॉक्स किंमत 5,50,000/- रुपये, 375 एम एल मापाचे 05 सिलबंद बॉक्स किंमत 72,000/- रुपये, बोलेरो मॅक्सी ट्रक बनावट वाहन क्रमांक एम एच 30 ए बी 2602 किंमत 5,00,000/- रुपये असा एकुण 11,22,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर गुन्ह्रात जप्त केलेले वाहन क्रमांक हे बनावटीकरण असल्याचे व अज्ञात चालक हा जंगलाचा फायदा घेवुन फरार झालेला असल्याचे दिसुन आल्याने पोलीस स्टेशन आष्टी येथे सदर अज्ञात चालक मालकाविरुद्ध कलम 465 भादंवी, सहकलम 65 (अ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्रातील पुढील तपास पोउपनि. मानकर करीत आहेत.

गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधिक्षक  निलोत्पल सा. यांनी अवैध दारु विक्री करणा­यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व अधिकारी यांना दिले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.