गडचिरोली च्या टोकावर असलेल्या नेलगुंडात एका दिवसात उभारले नविन पोलिस मदत केंद्र..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली:- जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नेलगुंडा येथे गडचिरोली पोलिसांनी एका दिवसात नवीन पोलीस मदत केंद्राची निर्मिति आज करण्यात आली आहे. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त असलेल्या भागात आदिवासी बांधवाचा विकास साधण्याच्या दृष्टीनं तसंच नक्षल कारवाईला आळा घालण्यासाठी हे पोलिस मदत केंद्र उभारले असल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसणार आहे. आणि गावे महामार्गाला जोडल्याने विकास होणार असल्याने गावकरीही गडचिरोली पोलिसाच्या मदतीला समोर येवून गावकऱ्यांच्या उपस्थितीत या पोलिस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीसाठी सी ६० कमांडो, २५ बीडीडीएसच्या टीम, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी आणि खाजगी कंत्राटदारांच्या मदतीनं केवळ अका दिवसांत हे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलं. डिसेंबर २०२४ मध्ये नेलगुंडा लगत असलेल्या पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.
हे पोलिस मदत केंद्र सर्वसुविधायुक्त असून, यामध्ये इंटरनेट सुविधा, १९ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाईल टॉवर, शौचालय सुविधा, टपाल सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, ०८ सँन्ड मोर्चा आदि सुविधा कऱण्यात आल्या आहेत. या मदत केंद्रात पोलीस दलाचे ४ अधिकारी, ४९ अंमलदार, राज्य राखील दलाच्या १० तुकड्या, तर केंद्रीय राखीव दलाचे ११३ जवान, १ सहाय्यक कमांडंट, ६९ अंमलदार तसंच विशेष अभियानासाठी ६ पथकं असे एकूण १५० अधिकाऱ्यांचं पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी १४ जून रोजी नेलगुंडा गावातल्या ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली होती. नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. नेलगुंडा आणि आसपासच्या गावातल्या नागरिकांची सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे पोलिस मदत केंद्र मैलाचा दगड ठरेल.
Comments are closed.