Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

झिमेलावासियांच्या मदतीला धावून आले अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली सिरोंचा महार्गापासून पूर्वेकडे जंगलात असलेल्या तिंमरम ग्रामपंचायत अंतर्गत झिमेला गावातील निर्माणाधीन पुलामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून नाल्याच्या पाण्यातून वाट काढावी लागत होती. झिमेला वासियांच्या व्यथाची माहिती मिळताच येथील पोलीस विभाग नागरिकांच्या मदतीला धावून आले आणि लगेच झिमेला येथील वाहतूक सुरु झाली.

मागिल अनेक वर्षापासून झिमेला येथील नाल्याला पूल नसल्याने पावसात तेथील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाला पार करावा लागत होता. ही व्यथा नागरिकांनी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या लक्षात आणून दिली असता,  जि.प. अध्यक्ष यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला परंतु पुलाचे काम सुरु असताना वास्तविकतेमध्ये कंत्राटदार यांनी नागरिकांना रहदारीसाठी पर्याय उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना येथील कंत्राटदार यांनी या बाबतीत दुर्लक्ष केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे झिमेला वासियांना दरवर्षी पेक्षाही यंदा जास्त त्रास होऊ लागला व पाण्यातून वाट काढून येण्याचा जीव घेणा प्रवास सुरुच होता ही बातमी माहिती होताच येथील नव्याने रुजू झालेले कर्तव्य दक्ष अधिकारी अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांनी राजाराम खांदला चे पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे यांना त्यांच्या हद्दीतील झिमेलाच्या  नागरिकांची वाहतुकीची समस्या तात्काळ सोडविण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे यांनी संबंधित कंत्राटदार यांना नियमानुसार झिमेला वासियांना तात्काळ वाहतूक सुरु करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी विनंती केली. संबंधित कंत्राटदार यांनी आपली चूक मान्य करून तात्काळ जे. सी. बी. च्या साहाय्याने माती टाकून झिमेला गावाकडे चारचाकी आणि टू व्हीलर वाहतूक होईल असा मार्ग तयार करून दिला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे झिमेला वासियांचा तात्पुरता जीवघेणा प्रवास आता सुखकर झाला असून उपविभागीय पोलीस अधीकारी अमोल ठाकूर आले तेव्हपासूनच त्यांनी नागरिकांच्या अनेक समस्या सोडविल्या असल्याने नागरिकांमध्ये या अधिकाऱ्याचे कोतुक केल्या जात आहे.

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज 3 कोरोनामुक्त तर 10 नवीन कोरोना बाधित

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर; तब्बल ४०,००० शिक्षकांच्या जागांसाठी होणार भरती

धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या

 

Comments are closed.