Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योग उभारण्यावर भर द्या : खा. अशोक नेते यांची केंद्रीय खाद्य प्रसंस्करण मंत्र्यांकडे मागणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, दि. २१ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे व कारखाने नसल्याने जिल्ह्याचा पाहिजे त्या प्रमाणात विकास होऊ शकला नाही परिणामी आजही लाखो बेरोजगार वणवण भटकत आहेत. जिल्ह्यात विविध उद्योग उभारून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात दुग्ध प्रक्रिया उद्योग व अन्य उद्योग निर्माण करण्यासाठी निधी मंजुर करण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी केंद्रीय खाद्य प्रसंस्करण मंत्री प्रल्हादसिह पटेल यांच्याकडे भेटी दरम्यान केली.

आज दि. २१ जुलै रोजी खा. अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिह पटेल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी खासदार अशोक नेते यांनी सांगितले की, जिल्ह्यात दुधाचे उत्पादन मोठया प्रमाणावर होत असून दुग्ध प्रक्रियावर आधारित उद्योगांची निर्मिती केल्यास हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल व ते विकासाच्या प्रवाहात सामील होतील.

त्यामुळे जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय खाद्य प्रसंस्करण मंत्री प्रल्हादसिह पटेल यांच्याकडे केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

झिमेलावासियांच्या मदतीला धावून आले अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर; तब्बल ४०,००० शिक्षकांच्या जागांसाठी होणार भरती

धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या

 

 

Comments are closed.