Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष/ उपाध्यक्ष निवडणूकाचा रंगला नाट्यमय सामना…

  • उंदरा मांजराच्या लपाछपीच्या खेळात माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे गटाचीच बाजी…
  • तर आमदार सुनिल  भुसारांच्या नेतृत्वाला तडा…?
  • अध्यक्षपदी वैदेही वाढाण, तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी – सिद्धार्थ म. सांबरे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

                बहुचर्चेत असलेली पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक कधी होणार..? याचे सर्वांनाच वेध लागले होते.. व या अध्यक्ष / उपाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस देखील लागली होती. तसेच रंग नाट्यमय सामना देखील रंगला होता. व अखेर या रंगमय नाट्य प्रकारावर पडदा पडला असुन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची प्रतीक्षा देखील संपली.

पालघर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक दि.२० जुलै २०२१ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अध्यक्ष पदासाठी भाजपाकडुन सुरेखा थेतले आणि शिवसेनकडून वैदेही वाढाण यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडुन उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सांबरे आणि महेंद्र भोणे यांनी  नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.

परंतु सुरेखा थेतले व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाल्याने अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे यांची बिनविरोध निवड झाली…

जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांनी ७ जुलै २०२१ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा कोंकण विभागीय आयुक्तांकडे दिल्यानंतर दि.९ जुलै २०२१ पासून समाज कल्याण सभापती विष्णू कडव हे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत होते.

तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने (६ जिल्ह्यांतील) पालघर जिल्हा परिषदेचे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषद सदस्य तथा उपाध्यक्ष निलेश सांबरे यांचे उपाध्यक्ष पद ही गेल्याने ते अनेक महिन्यांपासुन दिवसांपासुन रिक्तच होते.

अनेक दिवसांपासून पालघर जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत विजयी होऊन कोण बसणार..? याची सर्वांनाच उत्सुकता होती.

या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काही दिवसांतच निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच या कालावधीत अनेक राजकीय रंग नाट्यमय अशा घडामोडीने वेग पकडला.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनिल भुसारा ह्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा स्तरावर आपलेच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मनमानी कारभार सुरू असल्याने व ते जवळच्याच सदस्यांना अर्थात निकटवर्ती यांना जिल्हा परिषदेमध्ये पदांमध्ये स्थान देण्यासाठी आपल्याला डावलले जात असल्याची खदखद व भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जि.प सदस्यांना होती. 

हे जि. प सदस्य माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे यांचे समर्थक असुन निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय प्राप्त केला असुन त्यांना आमदार सुनिल भुसारा यांचे नेतृत्व अमान्य असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारून  आ. सुनिल भुसारा यांना शह देण्यासाठी आपला वेगळा गट  स्थापन करण्याचे ठरविले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पहावयला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ व कॉंग्रेसचा १ असे एकूण ७  जिल्हा परिषद सदस्यांनी बंडखोरी करून निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळ मागितली असताना त्यांनी ती वेळ राजकीय दबावापोटी मिळू न शकली नसल्याचा आरोप केला गेला.

तसेच जिल्हाधिकारी हे दिल्लीला गेलेत असे सांगितल्याने निलेश सांबरे समर्थक हे २ दिवसांपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षरशः ठाण मांडुन बसले होते. याच दरम्यान बंडखोरी केलेल्या  जिल्हा परिषद सदस्यांचा म्हणजेच निलेश सांबरे समर्थकांचा वेगळा गट स्थापन होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरी मोडण्यासाठी आमदार सुनिल भुसारा यांच्या मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू होत्या..

आ.सुनील भुसारा यांनी त्यांचे असलेले समर्थक व कार्यकर्ते यांना घेऊन ते थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने त्यांच्यात व बंडखोर जिल्हा परिषद सदस्य अर्थात निलेश समर्थक यांच्यात मोठा राडा ही झाला.

याच दरम्यान, आ. सुनिल भुसारा यांनी डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद गटातून निवडुन आलेल्या सदस्या मंदा घरट यांना जबरदस्ती करून आपल्या सोबत  घेऊन ही जाण्याचा व प्रयत्न ही केला होता.

मात्र त्यांची ही जबरदस्ती जिल्हा परिषद मंदा घरट ह्यांनी मोडीत काढल्याने ते आक्रमक झाले आणि त्यांनतर  निलेश सांबरे समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे पालघरचे डॉ. सुहास संख्ये व आमदार सुनिल भुसारा यांच्यात मोठी बाचाबाची झाली.

शेवटी आ. सुनील भुसारा यांना रिकाम्या हाताने परत पाठवले.

यावेळी मन दुखावलेल्या आ. सुनील भुसारा यांनी रिकाम्या हाताने परत जाताना उपस्थित असलेल्या व बंडखोरी केलेल्या निलेश सांबरे समर्थक जिल्हा परिषद सदस्यांना धमकी वजा इशारा देखील दिला होता..

परंतु तरी देखील बंडखोरी केलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या ह्या धमकी वजा इशाराला भिक घातली नाही.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जवळ येत असतानाच आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ६, काँग्रेस -१ अशा ७  जिल्हा परिषद सदस्यांनी केलेली बंडखोरी यामुळे “राष्ट्रवादी काँग्रेस” पक्षाची व आमदार सुनील भुसारा यांची डोकेदुखी खूपच वाढली होती.

त्यातच आमदार सुनिल भुसारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेला पराक्रम हा पक्षाच्या पथ्यावर पडणार हे निश्चितच होते. यामुळे पक्षाची बांधणी सैल होऊ लागली होती.

एकीकडे बंडखोरी केलेल्या सदस्यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण, तडफदार विक्रमगड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे यांची निवड व्हावी म्हणून निलेश सांबरे समर्थक आग्रहित होते व त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारले होते…

तर दुसरीकडे आमदार सुनील भुसारा यांचे निकटवर्तीय असणारे जिल्हा परिषद बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडावी म्हणून आ.सुनिल भुसारा हे शेवटपर्यंत प्रयत्न करीत होते व तसे राजकीय गणित जुळवा जुळवी करून देखील पाहत होते.

परंतु सध्या शिवसेनेचे १२ सदस्य, बहुजन विकास आघाडीचे ४, बंडखोर वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शिल्लक राहिलेले) १, आणि कम्युनिस्टचे (CPM) ४, अपक्ष – २ असे बलाबल सध्या असल्याने त्यांना सोबत घेऊन उपाध्यक्ष पद मिळवायचे असा हट्टाहास आमदार सुनिल भुसारा यांचा होता. परंतु यासाठी एकच (१) सदस्याची कमतरता/ गरज भासत होती.

मात्र आमदार भुसारा यांनी जि.प सदस्य काशिनाथ चौधरी  यांच्यासाठी आपले शर्थीचे प्रयत्न कायम सुरूच ठेवले होते. व जर का आ. सुनिल भुसारा यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असते तर..

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले निलेश सांबरे समर्थक सदस्यांना डावलून व त्यांना धडा शिकवून आपल्या मर्जीचा उपाध्यक्ष बसवायचा असे प्रयत्न सुरू होते.. मात्र त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश काही मिळताना दिसत नव्हते..

उलट अशा मुळे पक्षाला व स्वतःच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसण्याची शक्यता होती..

मात्र आमदार भुसारांना जेव्हा दुसरा धक्का बसला तो म्हणजे शिवसेनेकडुन..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरी केलेल्या सदस्यांप्रमाणेच शिवसेनेच्या देखील ५ सदस्यांनी बंडखोरी करुन निलेश सांबरे गटाला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत जिल्हा परिषद निवडणूकीत एक मोठा ट्वीस्ट देखील आला होता.यामुळे राजकीय समीकरण बदलणार असे चित्र पाहवयला मिळणार होते..

शिवसेनेकडुन अध्यक्ष पदासाठी वैदेही वाढाण व माजी आमदार अमित घोडा यांची पत्नी अमिता घोडा यांची नावे चर्चेत होती. पण त्यांना डावलण्याचे प्रयत्न ही काहीं कडुन होत होते.

अखेर निवडणूक अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपल्याने आणि त्यातच बंडखोर सदस्यांनी अर्थात निलेश सांबरे समर्थकांनी आपला गट नव्याने स्थापन करून दबाब निर्माण केला असल्याने राजकीय वातावरण देखील तापले होते.

पालघर जिल्हा परिषदेमध्ये “महाविकास आघाडी सत्ता” असल्याने *अध्यक्ष पद हे शिवसेनेकडे तर उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

यामुळे बंडखोर सदस्यांचा वेगळा म्हणजे स्वतंत्र गट स्थापन झाला असल्याने त्याचा दबाव तंत्राचा फटका हा कदाचित “महाविकास आघाडीला” बसण्याची शक्यता होती व त्यातच विरोधी पक्ष म्हणजेच नवीन गटाचा भाजपला पाठिंबा मिळाला किंवा “नवीन स्वतंत्र गटाला” *भाजपाचा पाठिंबा मिळाला तर महाविकास आघाडीची सत्ता जाऊ शकते.

हा “भाजपाचा” धोका व दबाव गट लक्षात घेऊन “शिवसेनेचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे” वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करून मध्यस्थी करावी लागली व त्यांच्यात चर्चा झाली आणि ही बंडखोरी शमविण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी होऊन तसे प्रयत्न झाले. व अखेर हे बंडखोरीचे वादळ शांत करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला एक अर्थी यश मिळाले. परंतु हे यश आ.भुसारांना मिळाले असते पण मात्र तसा त्यांच्या कडुन झाला नाही.

उलट पक्षांमधील कार्यकर्ते नाराज झाल्याने त्याचा फटका हा निवडणूकीत होईल व पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना लक्षात आल्याने त्यांनी मध्यस्ती केली.

अखेर बंडखोर सदस्यांनी स्वतंत्र स्थापन केलेला गटाची नोंदणी पुन्हा नवीन स्वतंत्र गटात “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या” वतीने केली आणि झालेल्या चर्चेअंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांचा गटाच्या अर्थात निलेश सांबरे समर्थकांच्या मागण्यांची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना घ्यावी लागली आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडुन पालघर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे यांच्या नावाची घोषणा देखील झाली.

त्यानुसार पालघर जि.प उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी बिनविरोध ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे निवडून आले. ह्या झालेल्या निवडणूकित माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे Vs आमदार सुनिल भुसारा असा रंग नाट्यमय सामना रंगला होता.

मात्र काही असो, उंदरा मांजराच्या लपाछपीच्या झालेल्या खेळात शेवटी माजी उपाध्यक्ष तथा जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या निकटवर्तीय गटांनीच (बंडखोरी केलेल्या गटांनी) बाजी मारल्याने आमदार सुनिल भुसारा हे सपशेल तोंडावर आपटले.

या घडलेल्या रंगमय नाट्य  प्रकारात आमदार सुनील भुसारा यांची झालेली नाचक्की व त्यांच्या नेतृत्वाला गेलेली तडा हे दिसून येते.

असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड मतदारसंघातुन निवडून आलेले आमदार सुनिल भुसारा यांना पुढील काळात अधिक व कठीण आवाहने असुन मनमानी पध्दतीने वागून चालत नाही हे झालेल्या प्रकरणातुन दिसुन येते, त्यामुळे त्यांनी देखील वेळीतच आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

तूर्तास माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे हेच पालघर जिल्हा परिषदेचे खरे किंग मेकर ठरले आहेत हे जनतेला पाहवयाला मिळाले आहे, हे नक्की खरं….

 हे देखील वाचा :

धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर; तब्बल ४०,००० शिक्षकांच्या जागांसाठी होणार भरती

झिमेलावासियांच्या मदतीला धावून आले अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी

 

Comments are closed.