Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटीव्ह, ब्रीच कँडीत दाखल.

मुंबई, २६ ऑक्टोबर : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पवार यांनी म्हटले आहे, “माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून, थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील आठवड्यात अतिवृष्टी झालेल्या भागाच्या दौर्‍यासाठी पवार सोलापूर जिल्ह्यात गेले होते. त्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागला होता. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ते स्वतः निवासस्थानी क्वारंटाइनमध्ये होते. क्वारंटाइनमध्ये असतानाही ते सरकारी बैठकांना हजेरी लावण्याबरोबरच कामकाजही पाहत होते.

प्रकृती नॉर्मल, विश्रांतासाठी रुग्णालयात दाखल : राजेश टोपे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“अजित पवार यांना खोकला होता, त्यामुळे कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती नॉर्मल आहे, फक्त विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच-सात दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. तसेच त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांची चाचणी केली असून ते सर्व जण निगेटिव्ह आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.