Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संतापजनक! कोरोनाने पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीची चिमुकल्यासह तळ्यात उडी घेऊन आत्महत्या!

  • लोहा शहरातील ऱ्हदयद्रावक घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. १५ एप्रिल: नांदेड जिल्ह्यात कोरोना काळात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने तीन वर्षीय चिमुकल्याला घेऊन लोहा शहरातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आंध्रप्रदेश येथील अम्मा पुरम येथील रहिवाशी असणारे शंकर गंदम हे गेल्या अनेक वर्षा पासून व्यवसाया निमित्त लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात आपली पत्नी पद्मा गंदम दोन मुली व मुलगा यासह वास्तव्यास होते.

लोहा शहरातील बालाजी मंदिरच्या पाठीमागे तेलंगणातून आलेले एक कुटुंब चटई विक्री व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करीत होते. कोरोना महामारीने या कुटुंबात शिरकाव केला. हनुमंत शंकर गंदम हे अँटिजेन तपासणीसाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात गेले होते त्यात त्यांचा अहवाल पॉसिटीव्ह आला त्यानंतर त्यांना लोहा येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पद्मा गंदम यांना पतीच्या मृत्यूचा धक्का बसल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पद्मा हनुमंत गंदम, लली, गंदम अशी मायलेकरांची नावे आहेत परंतु गंदम दांपत्याच्या या मृत्यूने दोन चिमुकल्या मुली मात्र अनाथ झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.