Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचा आणखी एक नेता नाराज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर : दि. १५ डिसेंबर रोजी राज्य  मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला सोमवार पासून हिवाळी अधिवेशन सुरु झालेले असून मंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेकजण नाराज आहेंत.

राज्य  मंत्रिमंडळात  मंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी अद्याप काही दूर झालेली नाही. मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत व विजय शिवतारे हे नागपूर येथील  हिवाळी अधिवेशन सोडून  तडक गावाकडे गेलेले आहेत.  त्यापाठोपाठ शिवसेनेचे मागथानेचे आमदार प्रकाश सुर्वेही प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी सुद्धा नागपूरचं अधिवेशन सोडून सरळ मुंबईला गेले असून आमदार प्रकाश सुर्वे यांनी आज मुंबईतील जनसंपर्क कार्यालय गाठले. त्यानंतर त्यांच्या शेकडो समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केलेली होती.  प्रकाश सुर्वे यांच्या  नागपूर अधिवेशन सोडून अचानक मुंबईत आल्याने कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली आहे. सुर्वे यांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे, अशी मागणी हे कार्यकर्ते करत होते. त्यामुळे हा परिसर घोषणांनी दणाणून गेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रकाश सुर्वे यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की,  मी नाराज नाही.पण दु:खी आहे.  मी पहिल्या दिवशीही तेच सांगितलं. आताही तेच सांगतो. मी लढवय्या कार्यकर्ता आहे. मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं प्रचंड दु:ख झालं. मी माझं दु:ख लपवलं नाही. मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे.मंत्रिमंडळात माझं नाव नाही, म्हणून मी दु:खी आहे, असं प्रकाश सुर्वे म्हणाले.

मी गरीबितून येवून आमदार झालो  एखाद्याला संधी नाकारल्यानंतर किती दु:ख होतं याची जाणीव शिंदेंना आहे. एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केलं. मलाही संधी मिळाली असती तर पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली असती. पक्षाला नंबर वनवर नेलं असतं, असंही ते म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते नाराज असून  मंत्रिपद न मिळाल्याने दीपक केसरकर, तान्हाजी सावंत, अब्दुल सत्तार, विजय शिवतारे असून त्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडून सरळ आपापल्या मर्डर संघात व घरी पोहचलेले आहेत.

हे पण पहा ,

 

Comments are closed.