Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अक्षयतृतीया या दिवशी होणारे बाल विवाह थांबविण्याबाबतचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.27 : गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरीकांना, मंगल कार्यालय, डेकोरेशन व्यावसायीक, कॅटर्स व्यावसायीक, फोटोग्राफर, भटजी, यांना आवाहन करण्यात येते की, अक्षयतृतीया हा दिवस 3 मे 2022 रोजी असून या दिवशी भारतातील काही भागात मोठया प्रमाणात विवाह आयोजित केले जातात.यावेळी बालविवाह सुध्दा मोठया प्रमाणात होण्याची शक्यता असते.बालविवाह हि प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असुन असे बालविवाह आयोजित करणे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम,2006 नुसार याविरोधात अजामिनपात्र गुन्हा नोंद केल्या जाते व विवाह बेकायदा ठरतात.

त्या अुनषंगाने गडचिरोली जिल्हयात होणाऱ्या बालविवाह बाबत पुर्व कल्पना आल्यास बालविवाह प्रतिबधंक अधिकारी (बाल विकास प्रकल्प अधिकारी,ग्रामसेवक) सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तथा अंगणवाडी सेविका,पोलीस पाटील,ग्राम बाल संरक्षण समिती संबधित पोलीस स्टेशन,चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष 9403704834 यांना कळविण्यात यावे.असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सक्षम-2022 संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन

 

 

Comments are closed.