Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 1ऑगस्ट 2023 ; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

सन 2019-20, 2020-21, 2021-22, व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यापूर्वी अर्जदार संस्था ज्यांनी, सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे त्या वर्षाकरीताचे चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी, ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे आवश्यक राहील.

समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी सदर पुरस्कारासाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज नमूद कागदपत्रासह सादर करावे. विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.