Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी सैनिक, विधवा व अवलंबितांची निवृत्तीवेतन समस्या सोडविण्यासाठी डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीमचे आगमन

माजी सैनिक, विधवा पत्नी व अवलंबित पेन्शनर यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 23 एप्रिल :जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व पेन्शनधारक अवलंबित यांच्या निवृत्तीवेतन विषयी समस्यांचे निवारण, स्पर्श, पीसीडीए संबंधी आणि अडचणीची समस्या सोडविण्याकरीता दि. 24 व 25 एप्रिल 2023 रोजी, सकाळी 10 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, चंद्रपूर येथे डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीम येणार आहे.

तरी, जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व अवलंबित पेन्शनर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता 07172-257698 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे (निवृत्त) यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.