Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कला, क्रीडा व संगणक शिक्षकांचे मुंबई धरणे, आंदोलन

जिल्ह्यातील 150 च्यावर शिक्षकांचा सहभाग

0

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

गडचिरोली, 28 जून – महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या 450 शासकीय आश्रमशाळात गेले सत्र वगळता मागील चार वर्षापासून १हजार २५० कंत्राटी कला , क्रीडा व संगणक शिक्षक कार्यरत होते. मागील सत्रात शाळेवर रुजू करण्यात आल्याने वारंवार पुनर्नियुक्तीसाठी मंत्रालय व आयुक्तालयात पाठपुरावा केलेला असताना सुद्धाआदिवासी विकास विभाग नियुक्तीसाठी टाळाटाळ करीत असल्याने आज 27 जून पासून मुंबईतील आझाद मैदानात जिल्ह्यातील 150 च्या शिक्षकांसह राज्यभरातील शिक्षकांनी धरणे आंदोलन करीत आहे .
28 डिसेंबर 2022 रोजी हिवाळी अधिवेशनावर कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षकांनी पदयात्रा काढून तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना अवगत केले असता त्यांनी सदर शिक्षकांना कायम करण्याचे आश्वासन दिले. आश्वासनाची पूर्तता करून सेवेत घेण्यासाठी राज्यातील सदर शिक्षकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
15 डिसेंबर 2023 ला सुद्धा विधान भवनावर धडक मोर्चा काढून आदिवासी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा व संगणक विषयापासून वंचित ठेवण्याच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या आकृतीबंधातील बाह्य स्वतःतून नियमित पदांमध्ये समावेश करण्यासाठी व आदिवासी विकास विभागाला जाग येण्यासाठी मुंबईत धरणे आंदोलनातून जिल्ह्यातील शिक्षक आरपारची लढाई लढत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.