Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत “कलाविश्व” तर्फे कलाकृतींची कार्यशाळा

धर्मराव कृषी विद्यालयाचे विद्यार्थी रमले "वारली" पेंटिंग मध्ये

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 22 एप्रिल : जिल्हाधिकारी व कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे विशेष प्रेरणा व सहाय्य असलेल्या कलाविश्वाच्या वतीने स्थानिक धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात विविध कलाकृतींची निशुल्क कार्यशाळा नुकतीच प्राचार्य अनिल भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

मध्यप्रदेश पाटणगड येथील शिक्षक चित्रकांत शाम यांनी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांनी वारली पेंटिंग शिकवून गोंडी पेंटिंगची सुद्धा माहिती दिली. कलाविश्व कार्यशाळेच्या माध्यमातून लुप्त होत असलेल्या कला पुनर्जीवित करता येत असल्याचे मत कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या प्रभारी पर्यवेक्षिका जयश्री खोंडे यांनी व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यशाळेच्या यशस्वीते करिता कमलाकर ठेंगरी, दिनेश ठीकरे, मुकेश गोंगले, मंगला भागवत,मनीषा गुडघाने, वंदना जाधव, कीर्ती विश्वनादुलवार, मंदा येसंबरे, नीता बर्डे, सीमा अमरी, हेमंत बोरकर यांनी केले. कार्यशाळेत 50 च्यावर मुला मुलींनी सहभाग घेतला. कार्यशाळेचे संचालन आतिश दोनतूलवार यांनी केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.