Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांची सालेकसा कोविड केअर सेंटरला भेट

  • औषध व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सालेकसा: दि. २७ एप्रिल: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी आज दि. २४ एप्रिल रोजी आमगाव विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्या दरम्यान सालेकसा येथे जाऊन तेथील आदिवासी मुलांचे वस्तीगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली व तेथील सोयी-सुविधा बाबत माहिती जाणून घेतली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज भासल्यास वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मिनी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सटेटर मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खा. अशोक नेते यांनी दिले.

यावेळी सालेकसा तालुक्याचे तालुका महामंत्री राजेंद्र बडोले, युवा मोर्चा चे हितेश डोंगरे, शर्माजी व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.