Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  गडचिरोली जिल्हयात  विधानसभा निवडणुकीत ३ जागेवर मतदान झाले महायुतीने जिल्ह्यातील दोन जागांवर विजय मिळवला तर आरमोरीत महायुतीचा विजय झाला. परंतु महायुती कडून आरमोरीतील पराभवाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारली नाही, पण गडचिरोलीतील विजयानंतर श्रेयवादाला तोंड फुटले आहे. तसेच जिल्हा कार्यकारिणीतील एका पदाधिकाऱ्याचा ‘किंगमेकर’ म्हणून गवगवा झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी भाजपचे सामान्य कार्यकर्तेच खरे विजयाचे शिल्पकार असल्याचे पत्रक काढून हा दावा खोडून टाकला आहे.

गडचिरोलीत दोन टर्म आमदार असलेल्ल्या डॉ. देवराव होळी यांनी  कार्यकारिणीतील सर्वाच्या नावांचा उल्लेख करून त्यांनी हे यश भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांमुळे शक्य झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर आरमोरीत मात्र सलग दोनवेळा विधानसभेत नेतृत्व करणारे भाजपचे कृष्णा गजबे यांचा महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या रामदास मसराम यांनी ६ हजार २१० मताधिक्यांसह पराभव केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरमोरीतील पराभव स्वीकारून कृष्णा गजबे दुसऱ्याच दिवशी जनसेवेत रुजू झाले.परंतु  या पराभवाची संघटनात्मक जबाबदारी घेण्यासाठी अद्याप कोणी पुढे आलेले नसताना गडचिरोलीत मात्र डॉ. नरोटे यांच्या विजयावरून श्रेयवादाची ठिणगी पडली आहे.

Comments are closed.