Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“बेस्ट” अधिकारी /कर्मचाऱ्यांसाठी दहा हजार शंभर रुपये सानुग्रह अनुदान महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले जाहीर .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर “बेस्ट” मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये इतके सानुग्रह अनुदान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दि.०४ नोव्हेंबर २०२० रोजी भायखळा, येथील महापौर निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर “बेस्ट” मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या पुढाकाराने पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल दिनांक ०३ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत बेस्टच्या कर्मचारी युनियनसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. कोरोना काळात “बेस्ट” ‘मधील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना ने- आण करण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्यामुळे त्यांना सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

भायखळा येथील महापौर निवासस्थानी आयोजित गटनेत्यांच्या बैठकीला उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते श्रीमती विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते श्री. रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेते श्रीमती राखी जाधव, सुधार समिती अध्यक्ष श्री. सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी, बेस्ट समिती अध्यक्ष श्री. प्रवीण शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलारासू,अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, “बेस्ट” व्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. सुहास सामंत, कार्याध्यक्ष अँड. उदय आमोणकर, सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष भूपेंद्र नांदोसकर,भास्कर तोरसकर, गणेश शिंदे हे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.