Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंतार्ली गावात बैलगाडा शर्यतींचा उडाला धुराळा; कल्याण ग्रामीण भागातही बैलगाडा शर्यती सुरूच

कोरोना नियमांचे तीनतेरा; न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कल्याण : डोंबिवली जवळील अंतार्ली गावात कोरोना नियम बाजूला सारत बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली असताना न्यायालयाचे आदेश झुगारून कल्याण ग्रामीण भागात बैलगाडा शर्तींचे आयोजन केले गेले आहे. तर मानपाडा पोलिसांनी देखील याकडे कानाडोळा केला असल्याचं समोर आलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली असतांना डोंबिवली जवळील अंतार्ली गावात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले गेले आहे. कोरोना नियम पायदळी तुडवत हजारोंच्या संख्येने प्रेक्षक बैलगाडा शर्यती पाहायला आले असल्याचं समोर आलं आहे. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटने गावात गुन्हे दाखल झाल्या नंतर आता बैलगाडा शर्यती मानपाडा पोलीस ठाण्याच्या अंतार्ली गावात भरवल्या असल्याच समोर आलं आहे.

एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजवला असतांना कोणाच्या आशीर्वादाने या बैलगाडा शर्यती भरवल्या जात आहेत असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून या बैलगाडा शर्यती सुरू असून पोलीस देखीक बघ्याची भूमिका घेत असल्याच समोर आलं आहे. एकीकडे कोरोनाची साखली तोडण्यासाठी सरकारने जमावबंदी जाहीर केली असताना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र बैलगाडा शर्यतींचे जत्राच भरली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र करणार आंदोलन…

’70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं’,- नाना पटोलें

 

Comments are closed.