Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छंद लागला जीवा…रहायला घर, कापडाचा झुला आणि खायला दूध,पाव… बच्चे कंपनी चे श्वान प्रेम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भंडारा, २६ डिसेंबर:  “भूतदया” हा शब्द केवळ लिखणापूर्ता मर्यादित राहिला की काय असे वाटू लागले आहे. प्राणी मात्रांशी दया भावनेतून मोठेच वागत नाही तर लहान्यांमध्ये ते गुण पाझरण्याची शक्यता फारच विरळ. परंतु यालाही काही अपवाद असतात, अशा गोष्टींमध्ये आनंद शोधतात. अशाच एका बच्चे कंपनी ने आनंद शोधलाय तो, कुत्र्याच्या पिलांची सेवा सुश्रुषा करण्यात. त्यांना छंदच जडलाय. स्वतःची तहान भूक विसरून पिलांच्या उदर्भरणाची चिंता करीत अख्खा दिवस त्यांच्यासाठी  घालविणाऱ्या या मुलांनी पिलांसासाठी घर उभारलेच, कपड्याच्या झुल्यात झुलवून झोपवूनही दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज आम्हाला भूतदया पहायला मिळते मात्र जरा सुधारीत. म्हणजे काय तर, कुत्री पाळली जातात, पण ती लाखो रुपये किमतीची. मग ती महागड्या गाड्या मधून फिरायला सुद्धा निघतात. पण हा छंद मोठे जोपासतात किंवा ठेवलेल्या गडी माणसांकडून हे सर्व केले जाते. यातून घरातील लहानग्यांवर भूतदयेचा किती पाझर होतो, हे सांगणे कठीण आहे. मात्र आजही याला अपवाद सापडू शकतात.

बच्चे कंपनी चे श्वान प्रेम

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

येथील एका वसाहतीच्या शेजारी असलेल्या बगीच्यात कुत्र्याची 7 पिल जन्माला आली आणि हे कळताच बच्चे कंपनीच्या मनातील प्राणी प्रेमही आज मुलांची सकाळ होते, ती “पपी” च्या आठवणीने सकाळीच ते सेवेसाठी निघतात, एक दोन नव्हे तर सहा ते आठ लोकांची कंपनी. या पिलांसाठी त्यांनी घर बनविले. थंडीपासून त्यांचे रक्षण व्हावे एवढाच त्यामागचा प्रामाणिक भाव. सकाळी उठल्यानंतर घरातून बाहेर काढून उन्हात ठेवणे, त्यांना खायला दूध, बिस्किट, पाव देणे. कापडाचा झुला करून झूलविणे असे सर्व उद्योग करतात. घर बनविण्यासाठी त्यांनी साहित्य गोळा करण्यासाठी घेतलेले परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. स्वतःची तहान भूक विसरलेले बच्चे मात्र पिलांच्या तहान-भूकेची विशेष काळजी घेत आहेत. त्यांची आंघोळ घालून कोरड करण्याचे कामही हे करतात.

गेल्या 4 दिवसांपासून लळा लागल्याने त्यांच्या प्रेमात वेडे झालेल्या या मुलांनी त्यांची नावे टायगर, स्विटी, राणी अशी सात वेगवेगळी नावे सुध्दा ठेवली आहेत. या सात पिलांची जबाबदारी सात मुलांनी घेत, जणू काही प्राणी मात्रांवर दया करण्याचा संदेश च देण्याचा प्रयत्न केला आहे. मोबाईल, व्हिडिओ गेम अशा भौतिक सुखसोयींचा वातावरणात वावरण्याची सवय झालेल्या आजच्या पिढीत प्राण्यांचे प्रतीची आस्था म्हणजे नक्कीच एक चांगले संकेत म्हणावे लागेल.

Comments are closed.