प्रदूषणाच्या धुरामुळे नागरिक त्रस्त, प्रदूषणामुळे आजाराना निमंत्रण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रोहा, १८ एप्रिल: रोहा तालुक्यापासून पाच किलोमीटरवर सिध्दीविनायक कन्स्ट्रक्शनचा डाबर प्लॅट आहे या डाबराचे मोठया प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळेच वनस्पतीला व आंबा,काजू,चिकू,या नैसर्गिक वनसंपत्तीला प्रदूषणाचा धोका पोहोचत आहे, रोहा तालुक्यातून खारी चेक नाक्यावरून मुरूड रोडने नागरिक प्रवास करीत असताना नाक मुठीत घेऊन त्याना प्रवास करावा लागत आहे या विषारी धुरामुळे नागरिकांना अनेक आजाराना सामोरे जावे लागत आहे.
आज कित्येक लोक सकाळी माॅनिग वाॅकसाठी स्वच्छ हवेचा स्वाद घेण्यासाठीच बाहेर पडत असतात पण या सवाॅना या विषारी प्रदूषणाचा सामना करावा आहे आजूबाजूला असणा-या गावातील डोंगरातील शेतक-याच्या आंबा, काजू,या पिकावरही याचा विपरीत परीणाम होईल दिवसेंदिवस पिकाची घट होताना दिसत आहे या या विभागातील स्थानिक पुढारी त्याना मिळणा-या ठेक्यामुळे या प्रदूषणाकडे कानाडोळाच करीत असताना दिसून येत आहेत याचा फायदा मालक घेत आहेत.
याचा परिणाम सामान्य नागरिकाच्या आरोग्यावर होत असून परिसरात विविध आजार फोफावत असल्याचे दिसून येत आहे उसर परिसरात काही दगडखाणी बेकायदेशीर असून या खनिज माफियाराज कडून त्या परिसरात सूरूग लावून आजूबाजूच्या डोगराला हादरा बसत आहे. प्रदूषण केले जात असून येथील नागरिक प्रवास करताना त्रस्त होत आहेत त्यामुळे येथील नागरिकाच्या जिवास धोका असल्याने या विभागात दगड खाणी व डांबर उत्पादक मशीनवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली आहे मात्र महसूल विभाग व संबंधित शासन या गंभीर समस्येकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
Comments are closed.