Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आ. रवी पाटील यांच्या आमदार निधीतून अत्याधुनिक सेवायुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. १५ एप्रिल: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सध्या कोरोना काळात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेची कमतरता जाणवत असल्याने जनतेची गरज ओळखुन ऑक्सिजन बेड व बेसिक सपोर्ट युक्त वातानुकुलीन सर्व सोयी युक्त रुग्णवाहिका आ. रवी पाटील यांनी आपल्या आमदार फंडातून उपलब्ध करून दिली आहे.

“कोरोना रोगामुळे पेण तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णांची  चांगली सोय झाली आहे. याचा लाभ जनतेला मिळेल. जनतेला सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात वेगळे समाधान मिळते. शासनाने निर्णय घेताना जनतेचा विचार करायला पाहिजे.” असे वक्तव्य पेण नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पेण मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून त्यामुळे शासकीय यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे. तालुक्यात असलेल्या रुग्णवाहिका कमी पडत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेड व  बेसिक सपोर्ट युक्त वातानुकुलीन सर्व सोयी युक्त रुग्णवाहिका आमदार निधीतून त्वरित उपलब्ध केली आहे.   

आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून  पेण शहर व पेण तालुक्यांतील जनतेसाठी ऑक्सिजन बेड व  बेसिक सपोर्ट युक्त वातानुकुलीन  रुग्ण वाहीका जनतेस समर्पित करण्यात आली. त्या रुग्ण वाहीकेचा लोकार्पण आमदार रविशेठ पाटील व पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह, माजी जि. प. विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडु, नगरसेविका देवता साकोस्कर, नगरसेविका आश्वीनी शहा, सभापती दर्शन बाफना, हिमांशु कोठारी, नगरसेविका तेजस्वीनी मंगेश नेने, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटिल, रविकान्त म्हात्रे, साकिब मुजावर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.