स्वच्छतेच्या शपथेचा संकल्प देशासाठी आरोग्यदायी कमांडंट मोहनदास खोब्रागडे
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,
अहेरी, 04 ऑक्टोबर : दरवर्षी 100 तास म्हणजे दर आठवड्याला जवळपास दोन तास श्रमदान करून स्वच्छता करण्याची शपथ व त्याच्या अंमलबजावणीचा संकल्प केल्यास देश निरोगी व आरोग्यदायी राहणार असल्याचे प्रतिपादन कमांडंट एम एस खोब्रागडे यांनी स्वच्छता पंधरवड्याच्या कार्यक्रमात अंमली दरम्यान केले.
प्राणहिता पोलीस मुख्यालयात स्थित 37 व्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने भारतासाठी स्वच्छता पंधरवडा घेण्याच्या दृष्टीकोनातून दलाने सक्रिय सहभाग घेऊन साफसफाई, स्वच्छता, आरोग्य व इतर उपक्रमांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी,कार्यक्रमात स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
प्रत्येकाने स्वच्छतेबाबत जागरूक राहून वेळ दिला पाहिजे. स्वच्छतेचा संकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने स्वतः कचरा टाकू नये किंवा दुसऱ्याला टाकू देऊ नये. स्वतःच्या घरी व गावात स्वच्छता मोहिमेबाबत जनजागृती केल्यास संपूर्ण देश स्वच्छतेच्या दिशेने परिपूर्ण होईल याच शंका नसल्याचे प्रतिपादन स्वच्छता पंधरवळ्याच्या कार्यक्रमात कमांडंट एम एस खोब्रागडे यांनी केले.
कार्यक्रमात उपकमांडंट अश्विन चंद्रमोरे, वैद्यकीय अधिकारी अरविंद सातोरे तथा 37 व्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिनस्त अधिकारी व शिपाई उपस्थित होते. सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेऊन आरोग्यदायी समाज घडविण्याचा संदेश यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने दिला आहे.
Comments are closed.