Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माकणे ग्रामपंचायातीचा भ्रष्टाचार लवकरच येणार चव्हाट्यावर…चौकशी समिती गठन करून भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

दहा वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून पैशाची अफरातफर केल्याचा उपसरपंच तनुजा घरत यांचा आरोप

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर : पालघर तालुक्यातील सफाळे जवळच्या माकणे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या दहा वर्षांमध्ये झालेली विकासकामे व पेसा अंतर्गत कामे, सदनिका, बांधण्यात आलेल्या गटारी व विहिरीची साफसफाई असा अनेक विकासकामांसाठी निधीचा गैरव्यवहार केला गेल्याचा गंभीर आरोप विद्यमान उपसरपंच तनुजा घरत यांनी केल्याने आणि या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठन करून भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाल्याने माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

माकणे ग्रामपंचायातीमध्ये दहा वर्षांपूर्वी सत्तेत असणारे बहुजन विकास आघाडीचे उपसरपंच तसेच, ग्रामसेवक यांच्या संगनमताने अनेक प्रकारे भ्रष्टाचार केला असल्याचा दावा उपसरपंच तनुजा घरत यांनी केला आहे. याबाबत नुकताच झालेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारात भ्रष्टाचाराचा विषय घेण्यात आला होता. अखेर या भ्रष्टाचाराची गुरुवारी पासून चौकशी समिती नेमुन चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे माकणे ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार लवकरच चव्हाट्यावर येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या 35 वर्षांपासून माकणे ग्रामपंचायत मध्ये बहुजन विकास आघाडीची एक हाती  सत्ता होती. या सत्तेचा उपभोग करुन करोडोच्यावर भष्टाचार करण्यात आला आहे. त्याबाबत उपसरपंच तनुजा करत यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतकडे माहितीचा अधिकार टाकून भ्रष्टाचार याचा कुरण उघड करण्यात आले. अनेक विकास कामे झाली नाहीत मग कुठे पैसा गेला अशी असा आरोप होत आहे. या परिसरात अनेक सदनिका बांधण्यात आल्या. मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते बनवण्यात आले नाही. त्याचप्रमाणे गटारे केली नाहीत. त्यामुळे सांडपाणी हे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेती खराब होत असून बोअरवेलचेही पाणी खराब होत आहे. शौचालय घोटाळा, दत्त मंदिर जिर्णोद्धाराच्या नावाखाली माजी उपसरपंच दिलीप तरे यांचा घोटाळा केला असल्याचे पत्रात म्हटले आहे. अशा कुठल्याही प्रकारे माहीती अधिकाऱ्यांमध्ये उत्तर ग्रामपंचायतयतीने दिले नाहीत. त्यामुळे उपसरपंच घरत यांनी भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवला असून प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत गुरुवारपासून भ्रष्टाचार संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा


माकणे ग्रामपंचायत हद्दीत दहा वर्षात अनेक विकास कामे केली मात्र कुठल्याही प्रकारे जाहिरात केली नाही. या संपूर्ण तपासात ठेकेदारानी कोणती कामे केली याचाही तपशील देण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. त्यामुळे संपूर्ण तपासणी व्हावी त्यासाठी उपसरपंच यांनी पत्रव्यवहार प्रशासनाकडे सादर केला होता. त्या भ्रष्टाचाराची तपासणी समिती नेमवून सुरू करण्यात आली आहे.

माकणे ग्रामपंचायतमध्ये केलेल्या भ्रष्टाचार संदर्भात जनता दरबार मध्ये उपसरपंच तनुजा घरत यांनी अर्ज केला होता. त्यानुसार सदर ग्रामपंचायत चा केलेल्या भ्रष्टाचाराचा अहवाल सादर करण्यासाठी विशेष समिती गठीत करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित भ्रष्टाचार विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी पत्रात म्हटले आहे.
“माकणे ग्रामपंचायतीत हद्दीत गेल्या दहा वर्षापासून कोट्यावधी रुपयांची अफरातफर करून भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून माजी उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी” -तनुजा घरत , उपसरपंच माकणे

Leave A Reply

Your email address will not be published.