Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 2 ऑक्टोबर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी एक महिन्यापूर्वी देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहीतीनुसार ही धमकी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक दक्षता घेण्यात आली आहे.

या धमकी बाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा अशा धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा धमक्या यापूर्वी ही देण्यात आल्या होत्या. माझ्या सुरक्षेसाठी पोलीस आणि गृहविभाग समर्थ आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यासाठी बीकेसी इथल्या मैदानाची पाहणी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.