Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

2 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयात  लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. येत्या २ डिसेंबरला दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे. लोकशाही दिनाच्या  दिवशी तक्रार अर्ज स्वीकारण्याची वेळ दुपारी २ ते ३ राहील.

लोकशाही दिनात तालुका स्तरावरील दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होऊन प्राप्त झालेल्या अहवालावर तक्रार कर्त्याचे समाधान न झाल्यास तालुकास्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर तक्रार अर्ज विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक राहील. असे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.